लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार तरुणावर पोस्को कायद्यातर्गत गुन्हा दाखल धाराशिव जिल्ह्यातील घटना
धाराशिव/ प्रतिनिधी रुपेश डोलारे : भूम तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून भूम पोलीस ठाण्यात एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की भूम तालुक्यातील एका गावात एप्रिल 2025 ते 10 जून 2025 या कालावधीत गावातीलच एका तरुणाने पीडित मुलीला आपल्या घरी बोलावून घेतले तेथे त्या तरुणांनी लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केला या घडलेल्या सर्व प्रकाराची माहिती पिडीत मुलीच्या आईने 26 ऑगस्ट 2025 रोजी पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली पीडित मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून भूम पोलीस ठाण्यामध्ये भारतीय न्याय संहिता कलम 64 64 (2) एम, पोस्को कायद्यांतर्गत कलम 4,8, आणि 12 अन्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास भुम पोलीस करत आहेत

0 Comments