कौटुंबिक वादातून पोटच्या मुलांनी केला जन्मदात्या आईचा खून; खून लपवण्यासाठी आत्महत्येचा बनाव-लोहारा शहरातील घटना-
![]() |
| मयत उमाबाई रणशुर |
धाराशिव प्रतिनिधी रुपेश डोलारे : कौटुंबिक वादातून मुलाने जन्मदात्या आईचा पत्नीच्या मदतीने बेदम मारहाण करून निर्गुण खून केल्याचे उघडकीस आले आहे याप्रकरणी मयत आईच्या दुसऱ्या मुलाने दिलेल्या फिर्यादीवरून लोहारा पोलीस स्टेशन मध्ये मारेकरी मुलगा व त्याची पत्नी यांच्या कोणाचा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही घटना दि, 25 ऑगस्ट रोजी दुपारी बारा ते एक वाजेच्या दरम्यान घडली. या घटनेने लोहारा परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की ,, दि. 25 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 12 ते 1 वाजण्याच्या सुमारास उमाबाई सुरेश रणशुर (वय 55, रा. लोहारा) यांना घरगुती वादातून आरोपी सौदागर सुरेश रणशुर व त्याची पत्नी पूजा सौदागर रणशुर (दोघे रा. लोहारा) यांनी शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर उमाबाईंना ठार मारून, साडीने गळफास लावून आत्महत्येचा बनाव केला, असा आरोप आहे.
![]() |
| आरोपी मुलगा व सुन |
या घटनेची फिर्याद महेश सुरेश रणशुर (वय 35, रा. लोहारा, ह.मु. शिवहरी ग्रीन सिटी, वापी, जि. वलसाड, गुजरात) यांनी लोहारा पोलीस ठाण्यात नोंदवली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी भा.न्या.सं. कलम 103(1), 352 तसेच 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.पोलिसांनी सांगितले की, घटनेनंतर उमाबाई रणशुर यांचा मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत आढळला. परंतु चौकशीतून मारहाण व खुनाचे स्पष्ट झाले. या प्रकरणाचा पुढील तपास लोहारा पोलीस करत आहेत.
आत्महत्येचा बनाव भासवण्यासाठी साडीने मृतदेह पंख्याच्या छताला अडकवला
मुलगा व सून यांनी 25 ऑगस्ट रोजी दुपारी बारा ते एक दरम्यान मयत उमाबाई मुलगा सौदागर सुन पूजा यांच्यात घरगुती कारणावरून भांडण झाले यावेळी मुलगा व सुनेने उमाबाई यांना शिवीगाळ करून तोंडावर लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली या मारहाणीत त्यांच्या तोंडातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव वाहू लागला यामध्ये त्या प्रथम बेशुद्ध पडल्या आणि यातच त्यांचा मृत्यू झाला ही बाब अंगलट येऊ नये म्हणून मुलगा व सुनेने संगणमत करून उमाबाईंना त्यांच्या अंगावरील साडीने गळफास लावून घरातील पंख्याला मृतदेह अडकवला आणि आईचा आत्महत्येचा बनाव करून बाहेर येऊन मुलाने मोठमोठ्याने आरडाओरड केली.
मुलगा व सून मारहाण करतानाचा व्हिडिओ क्लिप पोलिसांच्या हाती
या घटनेतील मयत उमाबाई यांचा मुलगा सौदागर व सुन पूजा हे उमाबाई यांना मारहाण करतानाचा व्हिडिओ फिर्यादीस व्हाट्सअप वर पाठवण्यात आला होता हा व्हिडिओ लोहारा पोलिसांच्या हाती लागला आहे या व्हिडिओ क्लिप मध्ये उमाबाई यांना असशील भाषेत शिवीगाळ व मारहाण करतानाचा व्हिडिओ आरोपीने तयार केला आहे या व्हिडिओमध्ये अतिशय क्रूरपणे मारहाण करत असताना दोन्ही आरोपी दिसून येत आहेत त्यामुळे या दोघांवर कठोरात कठोर कारवाई करून शिक्षा देण्यात यावी अशी मागणी नातेवाईक व ग्रामस्थातून होत आहे या घटनेमुळे आई मुलाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडल्याचे बोलले जात आहे


0 Comments