तुळजापूर तालुक्यातील सिंदफळ -अमृतवाडी परिसरामध्ये हिंस्र प्राण्याचे दर्शन, वाघ असल्याची प्रत्यक्षदर्शनी शेतकऱ्यांची माहिती ,दोन दिवसात तीन वासरांचा फडशा , शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण-
तुळजापूर प्रतिनिधी/रुपेश डोलारे : तुळजापूर तालुक्यातील अमृतवाडी- सिंदफळ शिवारात बाळासाहेब गंधुरे या शेतकऱ्याला शनिवारी रात्री दि,१६ रोजी नऊ ते साडेनऊ वाजेच्या सुमारास वाघ सदृश्य प्राण्याचे दर्शन झाल्याचे निदर्शनास आले आहे. शेतकरी गंदुरे यांच्या मोटरसायकलच्या लाईटच्या उजेडात हा प्राणी दिसून आला आहे . तसेच परिसरातील ठशाचे नमुने घेण्यात आली आहेत ;यामुळे तुळजापूर तालुक्यातील शिंदफळ -अमृतवाडी परिसरातील शेतकरी वर्गात,व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेच्या भीतीच्या वातावरणामुळे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कामासाठी मजूर येत नसल्याचे शेतकऱ्यातून सांगितले जात आहे. मागील सहा महिन्यापासून तुळजापूर तालुक्यातील अनेक भागांमध्ये वाघ बिबट्या अशा हिंस्र प्राण्यांनी धुमाकूळ घातल्याने तालुक्यातील शेतकरी भयभीत झाले आहेत.
या घटनेची अधिक माहिती अशी की, सिंदफळ अमृतवाडी येथील शेतकरी भगवान गंधोरे आणि महादेव गंधोरे यांची गाईचे वासरे दोन दिवसांपासून गायब होती. आजूबाजूच्या परिसरात वासराची शोधा शोधा केली असता, त्यांना आपली वासरे मृतावस्थेत आढळून आली. वाघाने या वासरांवर हल्ला करून त्यांना ठार केल्याचे स्पष्ट झाले आहे. या घटनेमुळे दोन्ही शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या घटनेमुळे शेतकरी वर्गामध्ये या हिंस्र प्राण्यांच्या दर्शनाने दहशतीचे वातावरण पसरले आहे.
.या घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, वाघाच्या हल्ल्यातच या वासरांचा मृत्यू झाल्याचे निश्चित केले आहे. मात्र, अद्यापही या वाघाचा ठावठिकाणा लागलेला नाही. वन विभागाकडून वाघाचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, परंतु वाघ दिसून न आल्याने परिसरातील नागरिकांची चिंता वाढली आहे. परिसरातील शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याची आव्हान वन विभागाने केली आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांना वाघ असल्याची शक्यता वर्तवली आहे. हा वाघ पहिल्याचे सांगितले जात आहे. या हिंस्र प्राण्याच्या दर्शनाने परिसरातील शेतकऱ्यासह ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे संबंधित वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी करून तात्काळ या हिंस्र प्राण्याला जेरबंद करण्यात यावे अशी मागणी परिसरातील शेतकरी व ग्रामस्थातून होत आहे.
तुळजापूर तालुक्यामध्ये मागील सहा महिन्यापासून बिबट्या वाघ या हिंस्र पाण्याने धुमाकूळ घातल्याने शेतकऱ्यास नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या प्राण्यापासून संरक्षणासाठी तुळजापूर येथील सामाजिक कार्यकर्ते लोकसेवा फाउंडेशनचे पंकज शहाणे हे नेहमी जनजागृती करत आहेत; ते स्वतः शेतकऱ्यांनी फोन केल्यानंतर घटनास्थळी जाऊन भेट देतात शेतकऱ्यांची समस्या जाणून घेतात व परिसरातील शेतकऱ्यांना सतर्क राहण्यासाठी सोशल मीडियाच्या द्वारे आव्हान करतात त्यांच्या कार्यामुळे शेतकऱ्यांना वेळोवेळी मदत होत आहे.
0 Comments