कळंब : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीस 21 वर्षांचा सश्रम कारावास कळंब येथील सत्र न्यायालयाचा निकाल-
धाराशिव /प्रतिनिधी रूपेश डोलारे : अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी तरुणास 21 वर्षाचा सश्रम करावास व सहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे कळंब (Kalanb) येथील जिल्हा सत्र न्यायालयाचे(Session Court) न्यायाधीश आर .के राजे भोसले यांनी शनिवार दिनांक 20 रोजी हा निकाल सुनावला आहे.
याबाबत सरकारी वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार कळंब तालुक्यातील एका गावातील फिर्यादी यांची मुलगी १९ जुलै 2021 रोजी सायंकाळी 5.30 वाजेच्या सुमारास शेतातून लिंबाचे फांदी आणते असे सांगून मोटरसायकल(Motorcyle) घेऊन गेली; नंतर ती घरी आली नाही फिर्यादी व तिच्या नातेवाईकांची तिचा शोध घेतला असता ती मिळून आली नाही; विजय किसन तवले या तरुणांनी फिर्यादीच्या अल्पवयीन मुलीस(Minor Girl) पळवुन नेल्याची माहिती मिळाल्यानंतर फिर्यादीने या प्रकरणी येरमाळा पोलीस ठाण्यात(Yermala Police Station) फिर्याद दाखल केली त्यावरून विजय याचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर गोरी यांनी या गुन्ह्याच्या(Offence invistigation) तपास केला त्यांनी आरोपी वापरत असलेला मोबाईलचा सीडीआर(Mobile CDR) व एसडीआर (SDR) काढून तपास केला त्यावरून आरोपी व पिडीता शिरोली तालुका खेड जिल्हा पुणे येथे जाऊन पोलिसांनी ताब्यात घेतली यानंतर पिडीतेला तेच पोलिसांनी विचारपूस करून जबाब नोंदवला आरोपीने पिडीतेला तिच्यासोबत काढलेले फोटो दाखवून तू सोबत आली नाही तर हे फोटो व्हायरल(Photo Viral) करेल असे म्हणत जबरदस्तीने पुणे तसेच शिरोली येथे नेऊन अत्याचार केल्याचे पिडीतिने पोलिसांना सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी तपास करून दोषारोपत्र(Chargesheet) कळंब येथील सत्र न्यायालयात सादर केले या खटल्याच्या सुनावणीत सरकार पक्षातर्फे एकूण आठ साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये पीडीतीची साक्ष महत्वपूर्ण ठरली तसेच वैद्यकीय अहवाल(Medical Report) इतर साक्षीदारांचे जबाब अतिरिक्त सरकारी वकील एडवोकेट सुरेश कुलकर्णी यांनी केलेला युक्तिवाद (Arguments)ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी विजय किसन तवले या तरुणास 21 वर्षाची शिक्षा व 6000 रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

0 Comments