आईला त्रास दिल्याच्या कारणावरून मुलांकडून जन्मदात्याचा खून लातूर जिल्ह्यातील घटना-
लातूर : दारूच्या नशीतील बाप लेखांच्या भांडणात दोन्ही मुलांनी केलेल्या बेदम मारहाणीत जन्मदात्या बापाचा मृत्यू झाल्याची घटना निलंगा तालुक्यातील बेंडगा येथे गुरुवारी दिनांक 18 रोजी सायंकाळी च्या सुमारास घडली आहे याप्रकरणी दोन्ही मुलावर खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दादाराव चन्नाप्पा मंजुळे राहणार बेंडगा तालुका निलंगा जिल्हा लातूर असे मारहाणीत मृत्यू झालेल्या पित्याचे नाव आहे.
या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार दादाराव चन्नाप्पा मंजुळे व त्यांचा मुलगा संजय दादाराव मंजुळे यांच्यात दारूच्या नशेत आईला विनाकारण मारहाण करण्याच्या कारणावरून दिनांक 18 गुरुवारी रोजी सायंकाळच्या सुमारास घरासमोर बाप लेकामध्ये भांडण सुरू होते त्यावेळी दादाराव मंजुळे यांनी त्यांचा मुलगा संजयला चावा घेतला त्यामुळे भाऊ जीवन दादाराव मंजुळे व आई वसलाबाई दादाराव मंजुळे यांनी दादाराव मंजुळे यांना जबर मारहाण केली या दादाराव मंजुळे यांचा मृत्यू झाला मात्र घटनेची माहिती कोणालाही न देता कुटुंबीयांनी मृतदेहाचा अंत्यविधी करण्याची तयारी करण्यात आली होती.
ही घटना औराद शहाजानी पोलिसांना समजतात तातडीने यांचे अंत्यसंस्काराचे तयारी थांबवली घटनेची चौकशी सुरू केली पोलिसांनी स्वतःहून गौतम माधव भोळे यांच्या फिर्यादीवरून मृताचा मुलगा जीवन दादाराव मंजुळे व संजय दादाराव मंजुळे व पत्नी वत्सलाबाई दादाराव मंजुळे यांच्याविरुद्ध औराद शहाजानी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे दोन्ही आरोपी मुलांना पोलिसांनी अटक केली आहे त्यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे असे सहाय्यक पोलीस निरीक्षक जनार्दन काळे यांनी सांगितले या घटनेचा अधिक तपास औराद पोलीस करत आहेत.

0 Comments