लग्नाचे आमिष , व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत एका 23 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार उमरगा तालुक्यातील घटना-Umerga Police Station Crime Case

Hot Posts

6/recent/ticker-posts

लग्नाचे आमिष , व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत एका 23 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार उमरगा तालुक्यातील घटना-Umerga Police Station Crime Case

लग्नाचे आमिष , व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत एका 23 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार उमरगा तालुक्यातील घटना-

प्रतिकात्म फोटो

धाराशिव /प्रतिनिधी रुपेश डोलारे : उमरगा तालुक्यातील एका गावात एका 23 वर्षीय तरुणीवर गावातीलच एका तरुणाने लग्नाचे आमिष व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी तरुणांने पीडितेवर साडेपाच वर्षे लैंगिक अत्याचार केले असे म्हटले आहे या गंभीर प्रकरणात आरोपी विरुद्ध 2 सप्टेंबर रोजी उमरगा पोलीस ठाण्यात(Umerga Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की उमरगा तालुक्यातील एका आरोपीने गावातीलच तरुणीला लग्नाचे खोटे आमिष दाखवून आणि याच अमिषाखाली तिच्यावर 18 डिसेंबर 2019 पासून एप्रिल 2025 पर्यंतच्या कालावधीत वारंवार लैंगिक अत्याचार केले. या दरम्यान त्यांनी पीडितेच्या नकळत या कर्त्याचे मोबाईलवर चित्रीकरण केले. त्यानंतर हे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करण्याची धमकी देऊन त्यांनी पिढीतला ब्लॅकमेल करणे सुरू ठेवले या सततच्या धमक्यामुळे आणि मानसिक त्रासामुळे पीडिता गप्प राहिली अखेर पीडितेच्या आईने धीर धरून उमरगा पोलीस ठाण्यात 2 सप्टेंबर रोजी आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.

एकंदरीत या तक्रारीच्या आधारे आरोपी तरुणाविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम((BNS) 64 आणि लैंगिक अपराधापासून बालकाचे संरक्षण पोस्को(Posco) कायद्याच्या कलम 4, 8, 12 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा अधिक तपास उमरगा पोलीस करत आहेत.

Post a Comment

0 Comments