"तुझा नवरा मरणार आहे "अशी भीती दाखवून जोगवा मागण्यासाठी आलेल्या दोन महिलांनी केली एका महिलेची 65000 हजाराची फसवणूक सोलापूर शहरातील घटना-
सोलापूर/ प्रतिनिधी रुपेश डोलारे : जोगवा मागण्यासाठी आलेल्या दोन महिलांनी एका महिलेची 65 हजाराची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे याप्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील दोन महिलांना ताब्यात घेण्यात आली आहे .ही घटना 24 सप्टेंबर रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास (उत्तर कसबा सिटी वाडा बाळीवेस सोलापुर) येथे घडली आहे.
या प्रकरणी स्नेहा प्रथमेश मंगळवेढे वय (22) राहणारी( उत्तर कसबा बळीवे सोलापूर) यांनी फिर्याद दाखल केली आहे फिर्यादी स्नेहा मंगळवेढेकर या घरी असताना दोन अनोळखी महिला जोगवा मागण्यासाठी घरासमोर येऊन तुझ्या नवऱ्यावर संकट येणार आहे त्याचा अपघात होणार आहे त्याच्यावर येणारे संकट टाळण्यासाठी तुला एक पूजा करावी लागते त्यासाठी जेवढे पैसे असतील तेवढे पैसे आणून माझ्या परडी मध्ये टाक असे म्हणून त्यांनी फिर्यादीचा विश्वास संपादन केला ; त्यानंतर त्यांनी त्यांच्या वडिलांनी ठेवलेली 65 हजार रुपये रक्कम पेटी मधून आणून ठेवली त्यानंतर त्या महिला देवी तुझं भलं करेल असे म्हणून निघून गेले आहेत असे फिर्यादीत नमूद केली आहे. या घटनेचा पुढील तपास करून पोलिसांनी दोन महिलांना अटक केली आहे, या महिला गुरुवारी सकाळी शहरामध्ये संशयितरित्या फिरत होत्या यावरून पोलिसांनी पाठलाग करून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.संगीता लहु शितोळे वय (22) राहणार भालकी बिदर तर गीता जालिंदर साळुंखे वय (20) वर्षे राहणार तुळजापूर जिल्हा धाराशिव असे महिला आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी दोन महिला विरुद्ध फौजदार चावडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

0 Comments