बीडच्या उपसरपंच गोविंद बर्गे आत्महत्याप्रकरणी नर्तिकी पूजा गायकवाड पोलिसाच्या ताब्यात, घातपात केल्याचा नातेवाईकांचा आरोप-Beed Govind Barge Suicide Matter Puja Gaiykwad

Hot Posts

6/recent/ticker-posts

बीडच्या उपसरपंच गोविंद बर्गे आत्महत्याप्रकरणी नर्तिकी पूजा गायकवाड पोलिसाच्या ताब्यात, घातपात केल्याचा नातेवाईकांचा आरोप-Beed Govind Barge Suicide Matter Puja Gaiykwad

बीडच्या उपसरपंच गोविंद बर्गे आत्महत्याप्रकरणी नर्तिकी पूजा गायकवाड पोलिसाच्या ताब्यात, घातपात  केल्याचा नातेवाईकांचा आरोप-


सोलापूर: बार्शी तालुक्यातील सासुरे येथे नर्तिकीच्या नादी लागून माजी उपसरपंच गोविंद जगन्नाथ बर्गे वय 34 राहणार लखामसला तालुका गेवराई जिल्हा बीड यांनी स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी मृत बर्गे यांची मेहुणे लक्ष्मण चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयीत पूजा देविदास गायकवाड वय 21 राहणार सासुरे तालुका बार्शी जिल्हा सोलापूर हिला पोलिसांनी ताब्यात घेतली आहे या घटनेत वापरण्यात आलेल्या पिस्टलचा तपास पोलीस करत आहेत .

बर्गे यांच्या आत्महत्याचप्रकरणी पूजा गायकवाड ला जबाबदार धरून नातेवाईकांनी पोलिसाकडे तक्रार दाखल केली आहे तर काही नातेवाईकांनी या घटनेत घातपाताची शक्यताही व्यक्त केली आहे चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बर्गे आणि पूजा ची ओळख 2024 मध्ये तुळजाभवानी कला केंद्र पारगाव येथे झाली या ओळखीचे रूपांतर प्रेम संबंध झाले त्यानंतर पूजाने  वारंवार बर्गी यांच्याकडे पैशाची मागणी केली बर्गेने तिला महागडे मोबाईल, बुलेट ,सोनं ,प्लॉट प्रतिवेकांच्या नावावर शेती जमीन तिच्या मावशीच्या नावावर प्लॉट खरेदी करून दिला शिवाय गेवराई येथील नवीन घर माझ्या नावावर कर अन्यथा तुझ्यावर बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करीन अशी धमकी दिली होती. सततच्या  पैशाच्या तगाद्यामुळे तो मानसिक दृष्ट्या खचला होता त्यांनी आपला मित्र चंद्रकांत शिंदेला देखील मी खूप निराश झालो आहे अशी सांगितल्याचे नमूद आहे दरम्यान यापूर्वीच पूजेला थेटर चालू करण्यासाठी सुमारे आठ लाख रुपये दिले होते परंतु सासरी येथील घर बांधण्यासाठी देखील तिला पैसा पुरवला होता एकंदरीत याप्रकरणी आता पूजा गायकवाड वर कोणती कारवाई होणार याकडे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments