मौजे उमरगा चि.येथील सरपंच सर्वेश्वर पाटील व ग्रामपंचायत सदस्य महादेव वडजे यांनी विविध मागण्यासाठी १ सप्टेंबर रोजी उपोषणास केला प्रारंभ.

Hot Posts

6/recent/ticker-posts

मौजे उमरगा चि.येथील सरपंच सर्वेश्वर पाटील व ग्रामपंचायत सदस्य महादेव वडजे यांनी विविध मागण्यासाठी १ सप्टेंबर रोजी उपोषणास केला प्रारंभ.

मौजे उमरगा चि.येथील सरपंच सर्वेश्वर पाटील व ग्रामपंचायत सदस्य महादेव वडजे यांनी विविध मागण्यासाठी १ सप्टेंबर रोजी उपोषणास केला प्रारंभ


""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""

राजे शिव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून केली उपोषणास सुरुवात.

""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""

सरपंच सर्वेश्वर पाटील यांनी ७ सप्टेंबर २०२५ रोजी जिल्हाधिकारी यांना दिले होते निवेदन.

"""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""


इटकळ (दिनेश सलगरे):- तुळजापुर तालुक्यातील मौजे उमरगा चि.येथील गट नंबर ३५१ मधील सुमारे ९१ एकर जमिनीवर अवैधरित्या व अनधिकृतरीत्या ताबा घेऊन व गावातील महादेव मंदिरावर अतिक्रमण करणाऱ्या व्यक्तींच्या त्रासाला कंटाळून ग्रामपंचायत कार्यालय येथे उमरगा (चि.)चे सरपंच मल्लिनाथ श्री.सर्वेश्वर सुभाष पाटील व ग्रामपंचायत सदस्य श्री.महादेव सुरेश वडजे हे १ सप्टेंबर २०२५ पासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून आमरण उपोषण करण्यास प्रारंभ केला.उमरगा चि. वक्फ बोर्डाच्या जमिनीमुळे येथील महादेव मंदिर, महालक्ष्मी मंदिर रस्ता, पाणीपुरवठा विहीर रस्ता , शाळेचे मैदान व स्मशानभूमी यांवर सदर व्यक्तींनी अतिक्रमण करून अडथळे निर्माण केलेली आहेत. साठवण तलावास गळती निर्माण करणे , अवैधरित्या पाणी उपसा करणे, वक्फ जमिनीत विना परवाना उत्खनन करणे, गावठाण डिपी वर विहिरीवरील मोटार चालवणे, गावातील घरकुल बांधकामास अडथळे निर्माण करणे, वक्फ जमिनीत विनापरवाना ऊस या पिकाचे उत्पादन घेऊन मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ करून घेणे व वक्फ बोर्डाचे उत्पन्न कमी दाखवणे अशा अनेक समस्या या जामा मस्जिद प्रतिबंधित सत्ताप्रकार या जमिनीमुळे गावकऱ्यांसमोर उभ्या आहेत. सदर जमिनीचा अवैध ताबा जिल्हाधिकारी साहेब अथवा जिल्हा वक्फ बोर्ड अधिकारी यांनी काढून घ्यावा असे सरपंच व गावकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळेच सोमवार दि.१ सप्टेंबर २०२५ पासून सरपंच सर्वेश्वर पाटील व ग्रामपंचायत सदस्य महादेव वडजे यांनी आमरण उपोषणास सुरुवात केली आहे.

Post a Comment

0 Comments