माजी मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांना सोलापूर विद्यापीठाची पीएच.डी प्रधान (साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यावर केले संशोधन )

Hot Posts

6/recent/ticker-posts

माजी मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांना सोलापूर विद्यापीठाची पीएच.डी प्रधान (साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यावर केले संशोधन )

माजी मंत्री प्रा. लक्ष्मणराव  ढोबळे यांना सोलापूर विद्यापीठाची पीएच.डी प्रधान

(साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यावर केले संशोधन )



____________________________

(धाराशिव / रूपेश डोलारे प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री प्रा.लक्ष्मणराव ढोबळे यांना मराठी विषयातून दिनांक 18 सप्टेंबर 2025 रोजी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल तथा कुलपती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूरचे सन्माननीय आचार्य देववृत ,गोवा येथील श्रीनिवास मुगेराया, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील,विद्यापीठाचे कुलगुरू प्रोफेसर डॉ. प्रकाश महानवर यांच्या शुभहस्ते पीएच.डी. (विद्यावाचस्पती) हे पदवी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांनी बहाल केली आहे.

    प्राध्यापक ढोबळे यांनी साहित्यरत्न डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या संबंधित साहित्य वर संशोधन केलेले आहे.डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांना त्यांनी दीड दिवसाच्या शाळेत पुरतेच मर्यादित न ठेवता अण्णाभाऊ साठे हे चालते बोलते विद्यापीठ होते जागतिक पातळीवरचे साहित्यिक होते, उत्कृष्ट शाहीर ,साहित्यिक खेळाडू विविध अंगांनी डॉ. ढोबळे यांनी संशोधन केलेले आहे.प्रा.ढोबळे यांनी शाहू शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना करून बहुजन समाजातील लोकांपर्यंत ज्ञानाची गंगा पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे.

सदर संशोधनासाठी त्यांना डी.बी.एफ दयानंद कला व शास्त्र महाविद्यालय सोलापूर येथील प्राध्यापक डॉ.देविदास गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले.सदर संशोधनासाठी त्यांची कन्या ॲड.कोमल साळुंखे यांनी मोलाचा हातभार लावला.या यशाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (श.प.) पक्षाचे अध्यक्ष सन्माननीय शरदचंद्रजी पवार, खा.सुप्रिया सुळे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments