मौजे इटकळ येथील व्यापारी गणेश मंडळाची मिरवणूक मोठ्या उत्साहात संपन्न.

Hot Posts

6/recent/ticker-posts

मौजे इटकळ येथील व्यापारी गणेश मंडळाची मिरवणूक मोठ्या उत्साहात संपन्न.

मौजे इटकळ येथील व्यापारी गणेश मंडळाची मिरवणूक मोठ्या उत्साहात संपन्न.


"""""""""""""""""""""""""""""""""""""""""""

हिंदू व मुस्लिम बांधव एकत्र येत गणेश महोत्सव केला साजरा.

"""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""

इटकळ (दिनेश सलगरे):- मौजे इटकळ येथील व्यापारी गणेश मंडळाची गणेश मिरवणूक मोठ्या उत्साहात संपन्न. प्रतिवर्षाप्रमाणे याही व्यापारी गणेश मंडळाने गणेश महोत्सवाच्या नऊ दिवसाच्या कालखंडात विविध धार्मिक सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबवून ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेतले. लहान मुलांसाठी लिंबू चमचा, निबंध स्पर्धा, चित्रकला, सुंदर हस्ताक्षर तर महिलासाठी संगीत खुर्ची, रांगोळी स्पर्धा व होम मिनिस्टर व तरुण मुलांचे लेझिम पथक आदि कार्यक्रम घेण्यात आले. पहिल्या तीन विजेत्या स्पर्धकांना मिरवणुकी दिवशी बक्षीस ही देण्यात आले.मंडळाचे आधारस्तंभ लियाकत खुदादे व मंडळाचे खजिनदार बालाजी सोनटक्के यांच्या हस्ते श्री गणेशाचे पूजन करून मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला.मिरवणुकीत हिंदू व मुस्लिम बांधव एकत्र येत जल्लोष केला. गणेश महोत्सव उत्साहात पार पाडण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष कबीर मिटकरी, बालाजी सोनटक्के, लियाकत खुदादे, हुसेन मकानदार, अहमद मकानदार, राम सोनटक्के, बाळू वाघमारे, अब्दुल शेख, फिरोज मुजावर, परमेश्वर हंनुरे, राजू तेलंग, जनार्दन मंडलिक, महेश सोनटक्के, भीमा घंटे, नामदेव गायकवाड, केशव गायकवाड यांच्यासह मंडळाचे सर्व कार्यकर्ते परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments