श्रीपतराव भोसले जुनिअर कॉलेजमध्ये गुरुवर्य के. टी. पाटील यांच्या जयंतीनिमित्त जिल्हास्तरीय वादविवाद स्पर्धा व वृक्षारोपण संपन्न
धाराशिव: श्रीपतराव भोसले जुनिअर कॉलेज, धाराशिव येथे आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त व गुरुवर्य कै. के. टी. पाटील यांच्या जयंती सप्ताह निमित्त विविध कार्यक्रम घेतले जात आहेत. यामध्ये प्रेरणादायी व्याख्यान, वृक्षारोपण, रक्तदान, हॉलीबॉल स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, गुणवंतांचा सत्कार, विज्ञान प्रदर्शन, मात्र-पित्र कृतज्ञता सोहळा, सेवानिवृत्त कर्मचारी सत्कार या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. याचाच एक भाग म्हणून दिनांक ८ सप्टेंबर रोजी वृक्षारोपण व जिल्हास्तरीय वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यामध्ये प्रथम के. टी. पाटील कॉलेज ऑफ इंजीनियरिंग परिसरात कॉलेजच्या वतीने 'एक पेड बप्पा के नाम' हे ब्रीदवाक्य घेऊन १००० झाडांची लागवड करण्यात आली. तसेच कॉलेजच्या प्रांगणामध्ये जिल्हास्तरीय वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. वादविवाद स्पर्धेसाठी 'सोशल मीडिया समाजासाठी वरदान की शाप' हा विषय ठेवण्यात आला.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते गुरुवर्य कै. के. टी. पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले. मान्यवरांच्या स्वागत सोहळ्यानंतर प्रत्यक्ष स्पर्धेला सुरुवात झाली. स्पर्धेच्या सुरुवातीला परीक्षक म्हणून लाभलेल्या श्री हंगरकर यांनी स्पर्धेचे नियम वाचून दाखवले. या स्पर्धेच्या माध्यमातून सोशल मीडिया हे समाजासाठी शाप की वरदान या विषयाच्या अनुषंगाने विविध स्पर्धकांनी अतिशय प्रभावीपणे मत-मतांतरे व्यक्त केली व वाद-विवादाच्या माध्यमातून प्रतिस्पर्ध्याच्या विषयावरती खंडन केले. या स्पर्धेत जिल्हाभरातील एकूण २६ संघातून ५२ स्पर्धकांनी सहभाग घेतला. या वादविवाद स्पर्धेत आर. पी. कॉलेजच्या क्षिरसागर प्रज्ञा संतोष व कदम सिद्धी राजकुमार यांनी प्रथम क्रमांक मिळवला. श्रीपतराव भोसले उच्च माध्यमिक विद्यालयाच्या शिनगारे श्रेया मधुकर व मुलानी जास्मिन जाकीर यानी दुसरा तर श्रीपतराव भोसलेच्याच पाटील मुक्ता बाळासाहेब व माने भार्गवी श्रीकांत यांनी तृतीय क्रमांक मिळवला. उत्तेजनार्थ पारितोषिकामध्ये तामलवाडीच्या सरस्वती महाविद्यालयाच्या सुरते साक्षी सूर्यकांत व रणसुरे श्रेया त्रिमूर्ती, धाराशिवच्या छत्रपती उच्च माध्यमिक विद्यालयाच्या रंगदळ कस्तुरी संदीप व साळुंके समृद्धी धनंजय,उमरग्याच्या डाॅ. के. डी. शेंडगे कॉलेजच्या खटके श्रावणी अनिल व जेवढे श्रद्धा जयराम यांनी यश मिळवले.
या वादविवाद स्पर्धेत काही स्पर्धकांना विषयाची प्रतिकूल बाजू प्रभावीपणे मांडल्या बद्दल सुरते साक्षी व वाघमारे श्रुती तर विषयाची अनुकूल बाजू प्रभावीपणे मांडल्याबद्दल श्रावणी निचळ व खटके श्रावणी यांना वैयक्तिक उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.
या वादविवाद स्पर्धेतील प्रथम, द्वितीय व तृतीय आलेल्या व उत्तेजनार्थ स्पर्धकांना अनुक्रमे ७००१, ५००१, ३००१, उत्तेजनार्थ १००१ रुपयांचे रोख बक्षीस, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत. विजेत्या स्पर्धकांना गुरुवर्य कै. के. टी. पाटील यांच्या जयंतीच्या कार्यक्रमानिमित्त दिनांक ११ सप्टेंबर रोजी बक्षिसाचे वितरण करण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून प्रा. डॉ. प्रकाश अंबादास कांबळे, प्राचार्य, श्रीमती सुशीलादेवी साळुंखे कॉलेज ऑफ एज्युकेशन, धाराशिव, प्रा. रवी सुरवसे छत्रपती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय धाराशिव, प्रा. डॉ. अरविंद विजय हंगरकर, आर. पी. कॉलेज, धाराशिव, प्रा. डॉ. वैभव आगळे, आर. पी. कॉलेज या मान्यवरांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कॉलेजचे प्राचार्य श्री. एन. आर. नन्नवरे यांनी भूषविले. या स्पर्धेसाठी संस्थेच्या सरचिटणीस सौ. प्रेमाताई पाटील, संस्थेचे सीईओ श्री. आदित्य पाटील, प्रशासकीय अधिकारी (फ्लाईंग किड्स) सौ. मंजुळाताई पाटील आदी मान्यवरांची विशेष उपस्थिती लाभली. तसेच उपप्राचार्य श्री. एस. के. घार्गे, कला व वाणिज्य पर्यवेक्षक श्री. के. के. कोरके, पर्यवेक्षक श्री. एम. व्ही. शिंदे, फ्लाईंग किड्सचे प्राचार्य श्री. चतुर्वेदी यादेखील मान्यवरांची उपस्थिती लाभली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन श्री. डी. व्ही. जाधव तर आभार प्रदर्शन श्री. एस. के. कापसे यांनी केले. या दोन्ही कार्यक्रमांच्या यशासाठी श्री. एस. एस. सदाफुले, श्री. व्ही. व्ही. वीर, श्री. एम. बी. डोलारे, सौ. ए. बी. तुंगीकर, सौ. पी. बी. मेटे, श्री. व्ही. बी. स्वामी, श्री. डी. वाय. घोडके, श्री. एस. व्ही. पाटील, श्री. एल. एस. शिंदे, श्री. एस. एल. तेली, श्री. एस. जी. ऐवळे इत्यादी प्राध्यापकांनी परिश्रम घेतले. या सर्व कार्यक्रमासाठी, उपक्रमासाठी संस्थाध्यक्ष श्री. सुधीर अण्णा पाटील, प्रशासकीय अधिकारी श्री. एस. एस. देशमुख आदींचे सहकार्य लाभले.



0 Comments