तुळजापूर येथील अविनाश रसाळ यांचा असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेना (शिंदे गटात) जाहीर प्रवेश
तुळजापूर प्रतिनिधी/रूपेश डोलारे: तुळजापूर शहरातील युवा नेते अविनाश रसाळ यांनी असंख्य कार्यकर्त्यासह शिवसेना (शिंदे गटात) जाहीर प्रवेश केला आहे. युवा नेते रसाळ यांनी शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे व स्वर्गीय आनंद दिघे साहेब यांचे विचार घेऊन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांचा सर्वसामान्य जनतेसाठी असलेल्या जिव्हाळा तसेच धाराशिव चे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे कार्य पाहून तुळजापूर शहरातील जिल्हा सहसंपर्कप्रमुख अमर राजे कदम परमेश्वर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून असंख्य कार्यकर्त्यांसह दि,१९ रोजी जाहीर प्रवेश केला आहे . याप्रसंगी त्यांची अनुसूचित जाती अनु-जमाती तुळजापूर विधानसभा तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली असून. यावेळी अनु.जातीजमाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष डीएन कोळी यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. हा कार्यक्रम तुळजापूर येथील जुने शासकीय विश्रामगृह येथे पार पडला.
यावेळी शिवसेना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डी. एन. कोळी साहेब व समशुद्दीन शेख व जिल्हा संपर्क प्रमुख अमर राजे परमेश्वर ,जिल्हा प्रमुख सूरज कोठावळे,खंडू कुंभार,देविदास राठोड, अक्षय कांबळे,ऋषिकेश रसाळ,मच्छिंद्र शिरसागर , समाधान रसाळ,विशाल मिसळ,दयानंद गायकवाड,सौरभ कसबे,बळीराम रसाळ,महादेव कांबळे, सतीश गायकवाड,आकाश उबाळे,सूरज भोसले,शंभू देव्हारे,अंकुश शिरसाट,विक्रम रसाळ,सज्जन रसाळ, विश्वा रसाळ यांच्यासह असंख्य कार्यकर्ते पदाधिकार उपस्थित होते.



0 Comments