चिवरी येथे बससेवा पूर्ववत सुरु, ग्रामस्थसह विद्यार्थ्यांना दिलासा-
![]() |
| प्रतीकात्मक फोटो |
चिवरी /राजगुरु साखरे : तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथे मागील अनेक वर्षापासून बस सेवा बंद होती. अखेर दि, २२ पासून सुरळीत बससेवा सुरू झाल्याने विद्यार्थीसह नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. येथील बस सेवा मागील पाच ते सहा वर्षापासून खंडित झाली होती, यामुळे विद्यार्थी सह नागरिकांचे मोठी गैरसोय होती. त्यामुळे नागरिकांचा विद्यार्थ्यांना खाजगी वाहनाचा आधार घ्यावा लागत होता. याचे गांभीर्य लक्षात घेऊन ग्रामस्थांनी खासदार ओमराजे निंबाळकर हे दि, १९ रोजी चिवरी परिसरात अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीची पाहणी करण्यासाठी आले होते त्यावेळेस ग्रामस्थांनी बस सेवा बंद असल्याची समस्या निंबाळकर यांच्याकडे मांडली. यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सर्व ग्रामस्थासमोर तत्काळ आगार प्रमुखाशी फोन द्वारे संपर्क साधून सुरळीत बस सेवा चालू करण्यांच्या कडक शब्दांत सूचना दिल्या होत्या.
त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस साहेबराव घुगे यांनीही येथे बंद असलेल्या बस सेवेबद्दल भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी व आमच्या भाजपच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी तुळजापूर आगार प्रमुखाशी वारंवार पाठपुरावा केला आहे . तसेच तालुक्याचे आ.राणाजगजितसिंग पाटील यांनीही स्वतः लक्ष घालून वारंवार पाठपुरावा केला असल्याने बस सुरू झाली अशी प्रतिक्रिया बालाघाट न्युज टाइम्सशी बोलताना श्री .घुगे यांनी दिली.
एकंदरीत दि,२२ पासून बस सेवा सुरळीत चालू झाली आहे त्यामुळे ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांतून समाधान व्यक्त केले जात आहे. आणि रखडलेली बस सेवा पुन्हा सुरू झाल्यामुळे ग्रामस्थांनी बस सुरू करणाऱ्या सर्व लोकप्रतिनिधीचे आभार मानले आहेत.

0 Comments