चिवरी परिसरात अतिवृष्टी सततच्या पावसामुळे द्राक्ष बागा धोक्यात, येथील दीपक जाधव यांच्या पावणेदोन एकर द्राक्ष बाग पाण्याखाली, उत्पादनावर परिणाम शेतकरी अस्मानी संकटाने हवालदिल
चिवरी : जिल्ह्यात गेल्या ४ वर्षांपासून वरुणराजाची अवकृपा होत आहे. कधी अवकाळी पाऊस , कधी गारपीट तर कधी अतिवृष्टी यामुळे धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी मेटाकुटीला आला आहे. तळहाताच्या फोडाप्रमाणे पिकांना जपायचे अन् वरुणराजाच्या अवकृपेमुळे त्याच पिकांना माती मोल होताना पाहायचं, अशी दुर्दैवी वेळ धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर येत आहे. यंदाही मागील पंधरा दिवसापासून पडत असलेल्या ढगफुटी सदृश पावसाने धुमाकूळ घातला असून यामध्ये खरीपातील सर्व पिकांचे व नगदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
मागील पंधरा दिवसापासून होत असलेल्या सततच्या पावसामुळे व अतिवृष्टीमुळे तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील द्राक्ष बागायतदार शेतकरी मेटाकुटीला आल्याचे दिसून येत आहे. गेल्या 15 दिवसापासून अतिवृष्टी आणि सततच्या पावसाने परिसरातील खरिपातील सर्वच शेती पिके पाण्यात गेली आहेत तर दुसरीकडे नगदी पीक म्हणून ओळखले जाणाऱ्या द्राक्ष बागेची तर प्रचंड नुकसान झाले आहे, या सततच्या पावसामुळे आणि अतिवृष्टीमुळे अनेक द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचले आहे त्यामुळे मुळकुज होऊन द्राक्षाच्या उत्पादनात मोठी घट होणार आहे त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे.
येथील शेतकरी दीपक जाधव यांच्या पावणेदोन एकर क्षेत्रावरील द्राक्ष बागेमध्ये अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे पूर्ण बागेमध्ये पाणी थांबले आहे त्यामुळे याचा परिणाम द्राक्षे झाड वाढीवर व उत्पादनावर होणार असल्याने शेतकरी चिंचेत पडला आहे . त्याचबरोबर आता ऑक्टोंबर ची द्राक्ष बागेची छाटणी केल्यानंतर या बागेत साचलेल्या पाण्यामुळे त्याचा परिणाम थेट झाडावर होणार असून त्यामुळे येणाऱ्या फळधारणा कमी प्रमाणात होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे बागेवर महागडे औषधी फवारणीचा भुर्दंड सोसावा लागणार आहे. या बागेसाठी शेतकरी जाधव यांनी 175000 हजार रुपये खर्च केला असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आता द्राक्ष बागेसाठी केलेला खर्च तरी निघतो का नाही? असा प्रश्न पडला आहे एकंदरीत शेतकऱ्यांना मागील १५ दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार ढगफुटी सदृश पावसाने चिवरी परिसरात अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. या पावसाने द्राक्ष बागांचे नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी कमालीचे हवालदिल झाले आहेत.


0 Comments