शेतकऱ्यावर आस्मानी संकट, शासनाने शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी रु.50000 ची मदत करावी -माजी मंत्री मधुकरराव चव्हाण Balaghatnewstimes Local News

Hot Posts

6/recent/ticker-posts

शेतकऱ्यावर आस्मानी संकट, शासनाने शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी रु.50000 ची मदत करावी -माजी मंत्री मधुकरराव चव्हाण Balaghatnewstimes Local News

शेतकऱ्यावर आस्मानी संकट, शासनाने  शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी रु.50000 ची मदत करावी -माजी मंत्री मधुकरराव चव्हाण 


"""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""

इटकळ (दिनेश सलगरे):- तुळजापूर तालुक्यात अतिवृष्टीने थैमान घातलेले असून शेतकऱ्यांचे खरीप पिकांचे व फळबागा पूर्णपणे नेस्तनाबूत झाले आहेत. खरीप हंगामातील कोणतेही पिके शेतकऱ्याच्या हाती लागणार नाहीत.तुळजापुर विधानसभा मतदारसंघातील सर्व मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली असून कांद्यासह खरीप पिके पाण्यामध्ये आहेत. त्याचबरोबर बागायती क्षेत्रातील ऊस संपूर्ण आडवा पडलेला आहे. त्याचबरोबर फळबागा जसे की  द्राक्षे, आंबा, पेरू, पपई यापासूनही शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन मिळणार नाही. कारण या झाडाच्या मुळाशी मागील दोन महिन्यापासून पाणी असल्यामुळे त्याला फळधारणा होणार नाही. त्यामुळे राज्य शासनाने पंचनामे करण्यात वेळ न घालवता सर्व शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी रू.50000 ची आर्थिक मदत तातडीने जाहीर करावी. कारण सर्व शेतकरी संपूर्णपणे नुकसानीत आहे. या अतिवृष्टीमुळे अनेक घरांमध्ये पाणी जाऊन सामान्य कुटुंबाचे नुकसान झाले आहै.त्याचेही पंचनामे  करून त्यांना मदत देण्याची गरज आहे. राज्य शासनाने याबाबत त्वरित निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी केलेली आहे.

Post a Comment

0 Comments