संतापजनक घटना : ३१ वर्षीय तरुणीचे अपहरण करून लैंगिक अत्याचार, चौघाजणाविरुद्ध गुन्हा दाखल धाराशिव जिल्ह्यातील घटना-
धाराशिव /प्रतिनिधी रूपेश डोलारे : वाशी तालुक्यातील एका गावातील 30 वर्षीय तरुणीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.याप्रकरणी पिडीतीने दिलेल्या तक्रारीवरून चार तरुणाविरुद्ध वाशी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की वाशी तालुक्यातील एका गावातील पीडित तरुणी हिला 14 सप्टेंबर रोजी रात्री 9 ते दिनांक 16 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजेच्या दरम्यान गावातील चार तरुणांनी एका चार चाकी गाडीत जबरदस्तीने बसून अज्ञात स्थळी नेले त्यानंतर त्या ठिकाणी चार आरोपी पैकी एका तरुणाने तिच्यावर बळजबरीने लैंगिक अत्याचार केला. या घटनेची माहिती कोणाला दिली दिल्यास जीवे व ठार मारण्याची धमकी देऊन तीन तरुणांनी पिडीतेला धमकी दिली या .भयंकर प्रकारानंतर पिडीतीने गुरुवारी दिनांक 18 रोजी वाशी पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. या पीडीतेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी चारही आरोपी विरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलम 140 (3) (4) 142 ,64 351 (2 ) (3) ,3(5) अन्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपीच्या शोध पोलीस घेत असून पुढील तपास वाशी पोलीस करत आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून महिला वर्गामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

0 Comments