यंदा दसरा दिवाळी सणावर ओल्या दुष्काळाचे सावट; बळीराजा अस्मानी संकटाने हतबल सरकारची मदत अजून कागदावरच-
धाराशिव / राजगुरु साखरे: सततच्या मुसळधार पावसामुळे धाराशिव जिल्ह्यातील नदी , नाली तुडुंब भरून वाहत आहेत अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाण्याचे तळे साचली असून हातात तोंडाशी आलेले सोयाबीन , उडीद, मूग आदी खरिपातील यासारखी पिके पूर्णतः नष्ट झाली आहेत या आसमानी संकटामुळे बळीराजा हवालदिल झाला असून शेतकऱ्यांचा दसरा दिवाळी सणाच्या आनंदावर विरजण पडले आहे याकडे प्रशासनाने लक्ष देऊन तात्काळ शेतकऱ्यांना मदत करणे गरजेचे आहे. दरम्यान सरकारने मदत जाहीर केली मात्र अजून कागदावरच मदत असल्याने शेतकरी मदतीकडे आस लावून बसला आहे.
यंदा पावसाने मे महिन्यापासूनच जोरदार हजेरी लावली मध्यंतरी थोडा पाऊस उघडल्याने शेतकऱ्यांनी कर्ज काढून पेरण्या पूर्ण केल्या खासगी सावकाराकडून काढलेल्या कर्जावर पेरणी केलेली शेतकऱ्यांची मेहनत अतिवृष्टीमुळे पूर्णता वाया गेली आहे. अनेक गावांमध्ये घरात पुराचे पाणी शिरल्याने धान्य व घरगुती साहित्य हे नष्ट झाली आहे शेतकरी पूर्णतः उध्वस्त झाला असून आता खाजगी सावकाराचे कर्ज कसे फेडायचे? आणि पुढे शेतात काय करायचे असे गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. महसूल प्रशासन तात्काळ शेत शिवार पाहणी करू शेतकऱ्यांना योग्य ती मदत द्यावी अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे . शेतकऱ्यांच्या उत्पन्नावरच व्यापारपेठ अवलंबून असल्याने यंदाचे अतिवृष्टीमुळे व्यापारी वर्गावर मोठे संकट वाढवणार आहे त्यामुळे शेतकरी राजाला साथ देऊन मदत करावी अशी मागणी होत आहे.

0 Comments