ध्येयवेडा सर्पमित्र शिवशरण नागसेन यांनी हातास प्लास्टर असतानाही एकाच हाताने सापास पकडुन निसर्गाच्या सानिध्यात सोडले.-
""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
सर्पमित्र शिवशरण नागसेन हे दैनिक तरुण सोलापूर येथे वसुली प्रतिनिधी म्हणून काम करतात.
"""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
इटकळ (दिनेश सलगरे):- दैनिक तरुण भारत सोलापूर येथील कार्यालयात वसुली प्रतिनिधींचे काम करणारे सर्पमित्र (Snake friend)शिवशरण नागसेन हे छोट्याशा अपघात झाल्याने जखमी होऊन हात फ्रॅक्चर झाला व हातास प्लास्टर केलेले होते त्यामुळे ते घरीच आराम करीत होते.शनिवार दि.२७ सप्टेंबर रोजी रात्री १२:३० च्या दरम्यान सोलापूर येथील लक्ष्मी विष्णू सोसायटी येथील घरात साप निघाला असल्याचा फोन आला. पण अपघातामुळे एका हातास प्लास्टर (Hand Plaster) असल्याने साप पकडण्यास अडचण येईल म्हणून सर्पमित्र शिवशरण नागसेन यांनी दुसऱ्या सर्पमित्राचा मोबाईल नंबर संबंधितांना दिला. पण तो दिलेला मोबाईल नंबर बंद होता.दुसऱ्या दोन सर्पमित्राना ही फोन लावला पण त्यांनी ही मध्यरात्री असल्याने फोन उचलला नाही. साप (Snake) घरात असल्याने घरातील मंडळी घाबरलेली होती शेवटी त्यांनी परत सर्पमित्र शिवशरण नागसेन(shivsharan Nagsen) यांना फोन लावला व म्हणाले की तुम्ही या तुम्हाला पाहिजे ती आम्ही ही मदत करू त्यामुळे हजारो सर्पाना जीवदान देणारे सर्पमित्र शिवशरण नागसेन स्वस्थ बसले नाही त्यांनी लगेच त्यांना मला गाडी चालवता येत नाही तुम्ही या असे सांगितले आणि १० मिनिटात ते आले सर्पमित्र(Snakefriend) शिवशरण नागसेन यांनी लागलीच घरात गेले व भिंतीच्या व कपाटाच्या फटीत असलेला सापास पकडुन सुरक्षित बाहेर काढले यावेळी घरातील सदस्यांनी सर्पमित्र शिवशरण नागसेन यांचे आभार मानले. सर्पमित्र (snakefriend) शिवशरण नागसेन यांनी आज पर्यंत हजारो सर्पाना पकडुन निसर्गाच्या सान्निध्यात सोडून जीवदान दिलेले आहे. सर्पमित्र शिवशरण नागसेन हे दैनिक तरुण भारत(Dainik Tarun Bharat) सोलापूर येथे वसुली प्रतिनिधी म्हणून काम करतात यांच्या या कार्याचे कौतुक गाव परिसरातून केले जात आहे.

0 Comments