तरुण शेतकऱ्याची नापिकी अन् कर्जाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या धाराशिव जिल्ह्यातील घटना-Dharashiv News Suicide Farmers

Hot Posts

6/recent/ticker-posts

तरुण शेतकऱ्याची नापिकी अन् कर्जाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या धाराशिव जिल्ह्यातील घटना-Dharashiv News Suicide Farmers

तरुण शेतकऱ्याची नापिकी अन् कर्जाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या धाराशिव जिल्ह्यातील घटना-


 धाराशिव  : धाराशिव तालुक्यातील जुनोनी येथील आयुब शेख वय(37) यांनी सततच्या पावसामुळे शेतातील पिकाची झालेली नुकसान  व वाढता कर्जाचा डोंगर या विवेचिंचेतून शेतातील झाडास गळफास घेऊन  आत्महत्या केली ही घटना गुरुवार दिनांक,4 रोजी सायंकाळी धाराशिव तालुक्यातील जुनोनी शिवारात घडली.

या घटनेबाबत अधिक मिळालेली माहिती अशी की, मागील वर्षी मयत मुन्ना यांची वडील आयुब शेख यांचे दीर्घ आजारांनी निधन झाले होते त्यावेळी दवाखान्यासाठी मुन्ना शेख यांनी खाजगी सावकारासह बँकेची पीक कर्ज असे पाच लाख रुपये कर्ज काढलेले होते यावर्षी त्यांनी आपल्या तीन एकर कोरडवाहू शेतीमध्ये सोयाबीनची पेरणी केली होती परंतु सततच्या पावसामुळे सर्व सोयाबीन पाण्यात गेले त्यामुळे आता लोकांचे पैसे कसे फेडायचे, त्यात लेकरांच्या शिक्षणाचा बोजा ,घर खर्च कसा भागवायचा या विवंचनेतून मुन्ना शेख यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे नातेवाईकांनी सांगितले आहे त्यांच्या पश्चात आई पत्नी तीन मुली एक मुलगा एक लहान भाऊ असा परिवार आहे मुन्ना शेख यांच्या पार्थिवावर जुनोनी येथील कब्रस्तान मध्ये दफनविधी करण्यात आला या घटनेमुळे परिसरात शोककळा   पसरली आहे.

Post a Comment

0 Comments