शेतकऱ्यांनो खचून जाऊ नका, आत्महत्या करू नका आम्ही तुमच्या सोबत आहोत उद्धव ठाकरेंनी बांधावर जाऊन साधला शेतकऱ्यांशी संवाद; पंचनामे नाही, तातडीची मदत देण्याची सरकारकडे केली मागणी-Dharashiv Udhav Thakare Farmers Rain Falls Visit

Hot Posts

6/recent/ticker-posts

शेतकऱ्यांनो खचून जाऊ नका, आत्महत्या करू नका आम्ही तुमच्या सोबत आहोत उद्धव ठाकरेंनी बांधावर जाऊन साधला शेतकऱ्यांशी संवाद; पंचनामे नाही, तातडीची मदत देण्याची सरकारकडे केली मागणी-Dharashiv Udhav Thakare Farmers Rain Falls Visit

शेतकऱ्यांनो खचून जाऊ नका, आत्महत्येचा मनात विचार आणू नका आम्ही तुमच्या सोबत आहोत उद्धव ठाकरेंनी बांधावर जाऊन साधला शेतकऱ्यांशी संवाद; पंचनामे नाही, तातडीची मदत देण्याची सरकारकडे केली मागणी-



धाराशिव /प्रतिनिधी रूपेश डोलारे : जिल्ह्यात मागील आठ दिवसापासून ढगफुटी सदृश्य पावसामुळे अतिवृष्टीत (Rain Falls) शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे त्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे(Udhav Thakare)  यांनी धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधून धीर दिला आहे. यावेळी बोलताना ठाकरे म्हणाले की पावसामुळे"शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील अश्रू सरकारला दिसत नाहीत का? कागदोपत्री पंचनाम्यांची वाट पाहण्यापेक्षा सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत तातडीने जाहीर करावी," असा थेट सवाल शिवसेना पक्षप्रमुख (Shivshena)उद्धव ठाकरे यांनी सरकारला केला आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी ते आज कळंब(Kalanb) तालुक्यातील इटकर येथे शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले होते.

मराठवाड्यात विशेषत धाराशिव जिल्ह्यात(Dharashiv District)  झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी, शेतमजूर आणि सामान्य नागरिकांचे (Common Man) मोठे नुकसान झाले आहे. अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांनी मेहनतीने उभी केलेली पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत, अनेकांची घरे वाहून गेली असून संसार उघड्यावर आले आहेत. या पार्श्वभूमीवर, श्री. ठाकरे यांनी आज इटकुर (itkur)येथील नुकसानग्रस्त भागाला भेट देऊन शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.

शेतकऱ्यांशी संवाद साधताना ते म्हणाले, "शेतकऱ्यांच्या घामाने उभं केलेलं पीक (Standing Crops) मातीमोल झालंय, संसार उद्ध्वस्त झाला आणि लेकरांचं भविष्य वाहून गेलंय. अशी भीषण परिस्थिती असताना सरकार पंचनाम्यांची वाट का पाहत आहे?" त्यांनी सरकारच्या दिरंगाईवर तीव्र नाराजी व्यक्त केली आणि तात्काळ(Urgent Help)  सरसकट मदत जाहीर करण्याची मागणी केली. तसेच माझ्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांची तात्काळ कर्जमाफी करा आणि शेतकऱ्याचा सातबारा कोरा करा , तसेच सरकार कायम योग्य वेळ येऊ द्या त्यावेळेस अमुक करू तमुक करू असे सरकार म्हणते तुमची योग्य वेळ येणार कधी ? त्यासाठी पंचांग पहावे लागणार का असा थेट सवाल उद्धव ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्री फडवणीस यांना केला आहे

या कठीण काळात शिवसेना (Shivshena)तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, असे आश्वासन देताना उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना धीर दिला."तुमच्या लढ्याच्या प्रत्येक पावलावर शिवसेना खांद्याला खांदा लावून सोबत असेल," असा शब्द त्यांनी उपस्थित शेतकरी(Farmers)  बांधवांना दिला.

या दौऱ्यावेळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार ओमराजे निंबाळकर,(Omraje Nimbalkar) आमदार मिलिंद नार्वेकर, माजी खासदार चंद्रकांत खैरे, आमदार कैलास पाटील,(Mla Kailas Patil)आमदार प्रवीण स्वामी, माजी आमदार दयानंद गायकवाड यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी, शिवसैनिक आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments