अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाल्यामुळे आता कर्ज कसे फेडायचे या विवेंचनेतून शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या भूम तालुक्यातील घटना-
धाराशिव/प्रतिनिधी/रूपेश डोलारे: मागील आठ दिवसापासून धाराशिव जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठी नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे त्यामुळे शेतकरी टोकाचे पावले उचलत आहेत. अशीच घटना भूम तालुक्यातील मात्रेवाडी येथे घडली आहे.
या घटनेबाबत अधिक माहिती अशी की शेता जवळून गेलेल्या ओढ्याचे पाणी शेतात शिरून जमिनीसह पिकांचे मोठे नुकसान झाले केलेल्या कांद्याची लागवडीही धुवून गेली आता डोक्यावरील कर्ज कसे फेडायचे संसार कसा चालवायचा या चिंतेतून भूम तालुक्यातील मात्रेवाडी येथील शेतकरी लक्ष्मण बाबासाहेब पवार यांनी शेतातील गोठ्यास गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी दिनांक 24 रोजी सकाळी 8 वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. मात्रेवाडी येथील शेतकरी लक्ष्मण पवार हे अल्पभूधारक शेतकरी आहेत त्यांची शेती त्याला तलावाजवळ असून जवळूनच ओढाही गेला आहे मागील आठ दिवसापासून सततच्या पावसाने व अतिवृष्टीने ओढ्याला मोठ्या प्रमाणात पाणी आले त्यामुळे शेतात लागवड केलेल्या कांद्याच्या पिकांसह शेती जमिनी ही मोठ्या प्रमाणात वाहून गेल्याने नुकसान झाले आहे. त्यांनी 25 ते 30 हजार रुपयांचे कांद्याचे रोप घेऊन लागवड केली होती या कांद्याच्या पैशावर त्यांनी पुढील खर्चाची नियोजन केले होते मात्र शेतीच वाहून गेल्याने डोक्यावरील कर्ज कसे फेडायचे पुढील उदरनिर्वाह कसा चालवायचा या विवंचेतुन ते होते याबाबत ते कुटुंबिया सह गावातील काही मित्रांसोबत ते बोलल्याचेही नातलगाकडून सांगण्यात आले आहे .याच विवेचनेतून त्यांनी बुधवारी शेतातील जनावरांच्या गोठ्यात गळफास घेऊन आत्महत्या केली त्यांना भूम ग्रामीण रुग्णालयात त्यांना मयत घोषित करण्यात आले त्यांच्या पश्चात आई पत्नी तीन मुले भाऊ भाऊ असा परिवार आहे या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
प्रतिनिधी रुपेश डोलारे धाराशिव

0 Comments