लग्नाचे आमिष, प्रेम संबंधातील मानसिक छळाला कंटाळून एका ३० तरुणीची विष प्राशन करून आत्महत्या, धाराशिव जिल्ह्यातील घटना -Kalanb Police Station Crime News

Hot Posts

6/recent/ticker-posts

लग्नाचे आमिष, प्रेम संबंधातील मानसिक छळाला कंटाळून एका ३० तरुणीची विष प्राशन करून आत्महत्या, धाराशिव जिल्ह्यातील घटना -Kalanb Police Station Crime News

लग्नाचे आमिष, प्रेम संबंधातील मानसिक छळाला कंटाळून एका ३० वर्षीय तरुणीची विष प्राशन करून आत्महत्या, धाराशिव जिल्ह्यातील घटना -Kalanb Police Station Crime News


धाराशिव/प्रतिनिधी रूपेश डोलारे  : प्रेम संबंधातील मानसिक छळाला कंटाळून  एका ३० वर्षीय तरुणीने  राहत्या घरात विषारी द्रव घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना कळंब शहरात उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणीमुळे तरुणीच्या नातेवाईकांनी दिलेल्या प्रथम फिर्यादीवरून कळंब पोलीस ठाण्यात दोन आरोपी विरुद्ध आत्महत्येला प्रवर्त केल्याचा गुन्हा दिनांक 8 सप्टेंबर रोजी दाखल करण्यात आला आहे.

या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की मनीषा राजू शिंदे वय (30) राहणार मुक बधिर शाळेजवळ कळंब अशी आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मनीषा ही गेल्या काही काळापासून राहुल राजेंद्र शिंदे राहणार (येरमाळा) यांच्यासोबत प्रेम संबंधात होती राहुल यांनी मनिषाच्या पगाराचे पैसे मागून त्याने मनीषा वर मानसिक दबाव आणला तुझ्या पगाराचे पैसे मिळाले तरच तुझ्याशी लग्न करेल? अशी अट त्याने वारंवार घातली त्यामुळे तिने सततच्या त्रासाला कंटाळून अखेर मनीषाने 7 सप्टेंबर रोजी राहत्या घरात विष प्राशन केले. तिला तात्काळ नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले ;मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर मनीषाच नातेवाईक संजय चंद्रकांत पवार यांनी कळंब पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली या फिर्यादीनुसार राहुल राजेंद्र शिंदे आणि त्यांचे सहकारी दुरगुडे यांनी मनीषाचा मानसिक छळ  केला यावरून कळंब पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 108 नुसार गुन्हा नोंदवला आहे संबंधित घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Post a Comment

0 Comments