कारला कट मारल्याच्या जुजबी कारणावरून सोलापूरच्या माहिती अधिकार कार्यकर्त्याची लातूरात चाकुने भोसकुन हत्या-
लातूर प्रतिनिधी: बार्शी रोड ते औसा रोड बाह्य वळण रस्त्याने सोलापूरकडे निघालेल्या ईरटीका कारचालकाने क्रुझर जीपला कट मारला याचा राग अनावर झाल्याने क्रुझर चालकांनी त्याची जीप कारला आडवी लावली दोघांमध्ये बाचाबाची होऊन लाथा बुक्क्यांनी मारहाण झाली यात क्रुझरमध्ये बसलेल्या आरोपीने जवळील चाकू काढत भोसकून ईरटीकातील तरुणाचा खून केला. हा वाद सोडवण्यास गेलेल्या कार मधील एका महिलेचाही छाती व पाठीवर चाकूचे वार केले आहेत यामध्येही महिला गंभीर जखमी झाली तिच्यावर लातूरमध्ये उपचार सुरू आहेत ही घटना बुधवार दिनांक 17 रोजी रात्री पावणे एक वाजेच्या सुमारास खाडगाव स्मशानभूमी जवळ घडली या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
अनमोल अनिल केवटे राहणार मंद्रूप तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर अशी चाकूने भोसकून हत्या केलेल्या इसमाचे नाव आहे त्यांच्यासोबत असलेली सोनाली भोसले वय (40) राहणार अंत्रोळी जिल्हा सोलापूर ही महिलेच्या छाती व पाठीवर चाकूने वार झाल्याने गंभीर जखमी झाली आहे तिच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत मृत अनमोल केवटे हा लातूर येथे एका कार्यक्रमानिमित्त आला होता कार्यक्रम आटोपून रात्री पावणे एक वाजेच्या सुमारास सोलापूर कडे निघाला होता त्याच्या कारने एका क्रुझर जीपला कट मारल्यामुळे क्रुझर चालकाने खाडगाव समशानभूमीजवळ त्याच्या कारला क्रुझर आडवी लावली बाहेर येऊन मृत अनमोल केवटे याला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली . आरोपी विष्णू शिवाजी मामडगे राहणार रेणापूर जिल्हा लातूर यांनी त्याच्या जवळील चाकू काढून मरत अनमोल केवटे यांच्यावर वार केले यात गंभीर जखमी झालेल्या अनमोल केवटे याचा जागीच मृत्यू झाला भांडण सोडवण्यास गेलेल्या सोनाली भोसले यांच्यावर ही चाकूची वार करण्यात आले यात त्या गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडल्या आरोपी विष्णू व त्याचे क्रुझरमधील सहकारी खून केल्यानंतर त्यांची गाडी सुसाट घेऊन रेणापूरच्या दिशेने गेले घटनेची माहिती कळताच अखिल भारतीय भ्रष्टाचार विरोधी संघटनेचे प्रमुख एडवोकेट प्रदीप पाटील खंडापूरकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी सोनाली भोसले यांना शासकीय रुग्णालयात हलवले तर अनमोल केवटे याला खाजगी रुग्णाण्यात हलवण्यात आली तेथे त्याला मृत घोषित करण्यात आली.
याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आरोपी विष्णू शिवाजी मामडगे राहणार रेणापूर व त्याचा भाऊ मंथन चंद्रकांत मामडगे राहणार( हनुमंतवाडी जिल्हा लातूर )यांच्या सह शुभम जयपाल पतंगे राहणार (संजय नगर बस स्थानकासमोर लातूर) यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी यातील आरोपी शुभम पतंगे या संशीयतीला ताब्यात घेतली आहे उर्वरित तीन आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत घटनेचे गांभीरे लक्षात घेऊन मध्यरात्रीच्या सुमारास अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर ,शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप सागर ,यांनी घटनास्थळी भेट घेऊन पाहणी केली या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एम.एच जिरगे हे करत आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे तर सोलापूर जिल्ह्यातील मंद्रूप गावावर शोककळा पसरली आहे.
फॉरेन्सिक लॅबने घेतली घटनास्थळावरून रक्ताची नमुने
चाकूने भोसकून खून केल्याच्या घटनेचे गांभीरे लक्षात घेऊन पोलिसांनी फॉरेस्टिक लॅबच्या पथकाला घटनास्थळी पाठवले होते त्यांनी घटनास्थळावरून रक्ताची नमुने घेतली आहेत त्याचप्रमाणे रेणापूर तालुक्यातील घनसगाव येथे थांबलेल्या क्रुझर जीपची ही त्यांनी तपासणी केली आहे त्यात कोणतेही शस्त्र आढळून आले नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
मयत केवटे होता सोलापूर जिल्ह्यातून हद्दपार
लातूर येथून सोलापूर कडे निघालेल्या मयत अनमोल केवटे हा माहिती अधिकार कार्यकर्ता होता अनेकांना धाक दाखवून त्यांना इजा करण्याचे गुन्हे दाखल आहेत त्यामुळे मागील काही वर्षांपूर्वी अनमोल केवटे याला सोलापूर जिल्ह्यातून हद्दपार केल्याचे ऐकवात आहे त्याच्यासोबत असलेली महिला ही अनमोल केवटे याची सहप्रवासी महिला असल्याचे पोलिसांनी सांगितले.
आरोपी ही गुन्हेगारी पार्श्वभूमीचाच
अनमोल कवटे याचा चाकूने भोसकुन खून करणारा रेनापुर येथील आरोपी विष्णू मामडगे गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असलेला आहे त्याच्या विरोधात रेनापुर पोलीस ठाण्यात 2016 मध्ये मारहाणीचे गुन्हे दाखल आहेत त्यामुळे तो जवळच चाकू घेऊन फिरत असल्याचा संशय पोलिसांना आहे.

0 Comments