सरकारने ओबीसी आरक्षण संपवलं या विवेंचनेतून ओबीसी तरुणाची मांजरा नदीत उडी घेऊन आत्महत्या लातूर जिल्ह्यातील घटना-Latur obc Aarakhshan Suicide News

लातुर /प्रतिनिधी रुपेश डोलारे: मराठा समाजाला हैदराबाद गॅजेट लागू करून सरकारने ओबीसीचा आरक्षण संपवला आहे आता ओबीसीच्या आरक्षणाचे कसं होणार या चिंतेतुन बुधवारी दिनांक 10 रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास रेनापुर तालुक्यातील वांगदरी येथील विवाहित तरुणाने मांजरा नदीपात्रात उडी घेत आत्महत्या केली त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांनी हस्तगत केली आहे.
या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की भरत महादेव कराड वय 35 राहणार वांगदरी हा वाहनावर बदलीचा चालक म्हणून काम करीत होता इतर वेळी हाताला मिळेल तो काम करीत असे. राज्य सरकारने मराठ्यांना हैदराबाद गॅजेट लागू करण्याचा आदेश केला यामुळे आता ओबीसींच्या आरक्षणाच कसं होणार अशी चिंता व्यक्त करीत भरत कराडे यांनी मांजरा नदीपत्रात उडी घेत आत्महत्या केली यावेळी काही तरुण त्या नदीपात्राच्या आसपास होती त्यांनी भरत कराड याला वाचवण्यासाठी नदीपात्रात उडी मारली मात्र त्याला वाचविण्याचा प्रयत्न अपयशी ठरला. या घटनेमुळे ओबीसी समाजात एकच खळबळ उडाली आहे.
नेमके चिठ्ठीमध्ये काय लिहल आहे?
भरत कराड यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे की, महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला हैद्राबाद गॅझेट लागू केल्यामुळे ओबीसींचे कायमस्वरूपी आरक्षण धोक्यात आले आहे. “आमच्या हक्काचे आरक्षण हिरावून घेतले जात आहे. यामुळे पुढील पिढीचे भविष्य अंधारात जाणार आहे,” अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. कराड यांनी यापूर्वीही ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनात सहभाग घेतला होता, असेही त्यांनी स्पष्ट केले.
भरत कराड हे शेती व्यवसाय करत होते आणि समाजातल्या प्रश्नांवर त्यांची नेहमीच स्पष्ट भूमिका होती. त्यांच्या आत्महत्येमुळे त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून, वांगदरी गावावर शोककळा पसरली आहे. नातेवाईकांच्या मते, आरक्षणावरील अन्याय सहन न झाल्याने त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला.
0 Comments