तुळजापूर : MKCL रौप्य महोत्सवी वर्ष व शिक्षक दिन सोहळा श्री समर्थ कॉम्प्युटर्स तुळजापूर येथे उत्साहात-Tuljapur Live News

Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापूर : MKCL रौप्य महोत्सवी वर्ष व शिक्षक दिन सोहळा श्री समर्थ कॉम्प्युटर्स तुळजापूर येथे उत्साहात-Tuljapur Live News

तुळजापूर : MKCL रौप्य महोत्सवी वर्ष व शिक्षक दिन सोहळा श्री समर्थ कॉम्प्युटर्स तुळजापूर येथे उत्साहात-


तुळजापूर प्रतिनिधी रुपेश डोलारे  : श्री समर्थ कॉम्प्युटर्स तुळजापूर येथे एमकेसीएल रौप्य महोत्सवी वर्ष आणि शिक्षक दिन कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मा. श्री. उमेश जगताप सर (मराठी अभिनेते) होते. प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. संजय घुले सर (आपटेक कॉम्प्युटर एज्युकेशन, कळंब), मा. श्री. विवेक कोरे सर व मा. श्री. रमेश नन्नवरे सर उपस्थित होते.

या सोहळ्यास मा. श्री. डॉ. सुदर्शन शिंदे सर, मा. श्री. जयराज सूर्यवंशी सर, मा. श्री. शिवाजी राठोड सर, मा. श्री. आगलावे सर, मा. श्री. वर्पे सर, मा. श्री. खोपडे सर, मा. श्री. राजेश जगताप सर, मा. श्री. संजय शेंडगे सर, मा. श्री. संजय पवार सर, मा. श्री. औदुंबर गव्हाणे सर, मा. श्री. तुकाराम मोटे सर तसेच मा. सौ. राणी जगताप मॅडम व तृप्ती नाईक मॅडम यांची मान्यवर पाहुणे म्हणून उपस्थिती होती.या प्रमुख मान्यवरांचे स्वागत मा. श्री. मोहनराव नाईक यांनी केले. प्रास्ताविक व आभार अनुराधा नाईक यांनी केले तर सूत्रसंचालन सायली भिसे यांनी केले.या कार्यक्रमात मा. श्री. संजय घुले सरांनी एमकेसीएल आणि AI बद्दल मार्गदर्शन केले. मा. श्री. विवेक कोरे सर आणि मा. श्री. रमेश नन्नवरे सर यांनी श्री समर्थ कॉम्प्युटर्सच्या यशस्वी वाटचालीवर प्रकाश टाकला. सर्व मान्यवरांनी संस्थेच्या विविध उपक्रमांचे कौतुकास्पद वर्णन केले.यामध्ये विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले. 



Post a Comment

0 Comments