मौजे उमरगा चि.येथील सरपंच यांचे आमरण उपोषण लेखी आश्वासनानंतर मागे

Hot Posts

6/recent/ticker-posts

मौजे उमरगा चि.येथील सरपंच यांचे आमरण उपोषण लेखी आश्वासनानंतर मागे

मौजे उमरगा चि.येथील सरपंच यांचे आमरण उपोषण लेखी आश्वासनानंतर मागे.


"""""""""""""""""""""""""""""""""""""""""""

गावच्या विकासासाठी सरपंच यांनी तब्बल चार दिवस केले उपोषण.

""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""

इटकळ (दिनेश सलगरे):- उमरगा चि.येथील सरपंच सर्वेश्वर सुभाष पाटील व ग्रामपंचायत सदस्य महादेव सुरेश वडजे यांनी दिनांक 1 सप्टेंबर 2025 पासून सुरू केलेल्या आमरण उपोषणास यश आले आहे. उमरगा चिवरी येथील गट नंबर 351 मधील जमीन जामा मस्जिद उमरगा यांच्या सेवेकरिता दिलेली आहे यास मुतवली म्हणून नेमणूक केल्या असल्या बाबत व्यक्तीचे निधन झाले असल्याकारणाने त्याच्या वारसास त्याचा ताबा मिळावा तसेच गट नंबर 321 गावठाण यामध्ये वक्त जमिनीतील ताबेदार असणाऱ्या व्यक्तीने अतिक्रमण केलेले दोन्ही गटांच्या मोजणीनंतर सिद्ध होईल ती मोजणी येथून पुढे चार ते सहा आठवड्यात मोजणी करण्यासंदर्भात उपाधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय तुळजापूर यांना कळवण्यात आले आहे व ज्यांनी अतिक्रमण केले असेल त्यांच्यावर वक्फ नियमानुसार कठोर कारवाई करू असे आश्वासन दिले.

ज्यांनी गट नंबर 351 मध्ये अतिक्रमण केले आहे तसेच बांधकाम व विकास करण्याची परवानगी न घेता बदल केले असतील ते सिद्ध झाल्यास त्यांच्यावर कारवाई करू.नळदुर्ग येथील अपर तहसीलदार यांनी संबंधित उपोषणसंदर्भात गट नंबर 321 व 351 यांची संयुक्त मोजणी अहवाल उपाधीक्षक भूमी अभिलेख तुळजापूर यांच्याकडे मागणी करण्यात आल्या बाबत कळवले तसेच संयुक्त मोजणी अहवाल व कमी जास्त पत्रक चार ते सहा आठवड्यात हस्तगत करून लघु पाटबंधारे प्रकल्प चिवरी उमरगा या संपादित झालेली जमीन संबंधित सातबारा वरती नियमानुसार कारवाई करून ते क्षेत्र नोंदवण्याबाबत आदेशित करण्यात आले.

एकंदरीत येत्या महिना ते दीड महिन्यात प्रशासन स्तरावरती योग्य ती कारवाई करून उमरगा चिवरी गावावरती होणारे अतिक्रमण निश्चित होऊन गावाचा नकाशा गावासमोर सादर केला जाईल यानंतर सर्व चित्र स्पष्ट होईल असे अपर तहसीलदार  यांनी कळवले.

Post a Comment

0 Comments