मुख्यमंत्र्याच्या नागपुरात प्रलंबित देयकामुळे निराश कंत्राटदाराची गळफास घेऊन आत्महत्या - कंत्राटदार आत्महत्येचा दुसरा बळी
नागपुर /प्रतिनिधी रूपेश डोलारे: राज्य सरकारने हजारो कोटी रुपयांची बिले थकून ठेवल्यामुळे कंत्राटदारामध्ये निराशीचे वातावरण पसरले आहे; काही दिवसांपूर्वी हर्षद पाटील या तरुण कंत्राटदारांनी आपल्या स्वतःच्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. आज मुख्यमंत्र्यांच्या गावातच या घटनेची पुनरावृत्ती पाहायला मिळाली आहे. प्रेमवच्छा वर्मा, या कंत्राटीकाराने दराने आपल्या स्वतःच्या घरातच गळफास घेऊन जीवन संपवले असल्याची धक्कादायक घटना घडली आहे . सदरील मयत कंत्राट दाराची नागपुर सार्वजनिक बांधकाम विभागाकडे ३८ कोटींची देयके प्रलंबित आहेत; सरकारकडून दिले दिले न गेल्यामुळे कंत्राटदाराच्या मागे बँकांनी तगादा लावला आहे, यामुळे कंत्राटदार मेटाकोटीस आले आहेत त्यामुळे कंत्राट दारामध्ये नैराश्य पसरले आहे. नागपुर येथे , वर्मा यांनी दि,१ रोजी येथे सकाळी सहा वाजून च्या सुमारास आत्महत्या केली असल्याचे खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.
सदर शासनाच्या याच कंत्राटदार यांची देयके न देण्याच्या धोरणामुळे महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ व राज्य अभियंता महाराष्ट्र राज्य पाणीपुरवठा कंत्राटदार संघटना सातत्याने गेल्या एक वर्षापासून आंदोलन करीत आहेत यापुर्वीच बरोबर एक महिन्यापूर्वी जलजीवन मिशन चे कंत्राटदार हर्षल पाटील यांनी पण आत्महत्या केली होती . शासनाच्या या असल्या दिवाळखोरी कारभार बाबत आता गणपती विसर्जन झाले बरोबर एक राज्यस्तरीय बैठक पुणे येथे आयोजित करून या सर्व विषयाचा कायमचा सोक्षमोक्ष लावण्याचा निर्णय घेणार आहे अशी माहिती महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ , राज्य अभियंता संघटना, महाराष्ट्र राज्य पाणीपुरवठा कंत्राटदार संघटना यासह इतर संघटनांनी घेतला आहे.

0 Comments