धाराशिव: पवनचक्कीविरोधात तक्रार करून उपोषण केल्याच्या रागातून एका तरुण शेतकऱ्यास पवनचक्की कंपनीच्या गुंडाकडून बेदम मारहाण, पवनचक्की भूम तालुक्यातील घटना-Pawanchakki Dharashiv Bhum Police Station Crime

Hot Posts

6/recent/ticker-posts

धाराशिव: पवनचक्कीविरोधात तक्रार करून उपोषण केल्याच्या रागातून एका तरुण शेतकऱ्यास पवनचक्की कंपनीच्या गुंडाकडून बेदम मारहाण, पवनचक्की भूम तालुक्यातील घटना-Pawanchakki Dharashiv Bhum Police Station Crime

धाराशिव: पवनचक्कीविरोधात तक्रार करून उपोषण केल्याच्या रागातून एका तरुण शेतकऱ्यास पवनचक्की कंपनीच्या गुंडाकडून बेदम मारहाण, पवनचक्की   भूम तालुक्यातील घटना-



धाराशिव/प्रतिनिधी रूपेश डोलारे  : जिल्ह्यामध्ये मागील तीन वर्षापासून, तुळजापूर लोहारा वाशी परंडा या तालुक्यामध्ये पवन ऊर्जा गुंडांनी धुमाकूळ घातला असून शेतकऱ्यांच्या जमिनीचा मोबदला योग्य न देणे, जमीन द्यायला शेतकऱ्याचा विरोध असेल तर  शेतकऱ्यांना दमदाटी करणे,शेवटी गुंडाकडून  पोलीस प्रशासनाला हाताशी धरून काम करणे, शेतकऱ्याची इच्छा नसताना जमिनीवर टॉवर उभारणे असे प्रकार या पवनचक्की कंपनीच्या दलालाकडून व गुंडाकडून वारंवार होत आहेत मात्र याकडे ना प्रशासनाचे लक्ष, ना लोकप्रतिनिधींचे लक्ष यामुळे सामान्य शेतकरी मेटाकुटीस आला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना जीवन जगणे मुश्किल झाले आहे असाच प्रकार धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यात आज उघडकीस आला आहे.

 पवनचक्कीच्या कामाविरोधात तक्रार करून उपोषण केल्याच्या रागातून भूम तालुक्यातील घाटनांदुर येथील एका तरुण शेतकऱ्याला अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बजरंग कोळेकर असे मारहाण झालेल्या शेतकऱ्याचे नाव असून, ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर बार्शी येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार बजरंग कोळेकर यांनी आपल्या गावात सुरू असलेल्या पवनचक्कीच्या कामासंदर्भात प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या आणि याविरोधात उपोषणही केले होते. याचा राग मनात धरून पवनचक्कीशी संबंधित काही गुंडांनी त्यांना लक्ष्य केले. या घटनेमध्ये जखमी झालेले शेतकरी बजरंग कोळेकर यांनी आरोप केला आहे की, "मला तब्बल २२ मिनिटे हॉकी स्टिक आणि स्टंपने जबर मारहाण करण्यात आली." मला जर कोणी मारहाण करताना सोडवायला नाही आले असते तर माझा संतोष देशमुख झाला असता असे ते मीडियाशी बोलताना म्हणाले. या मारहाणीत ते गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने उपचारासाठी बार्शी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कोळेकर यांनी यापूर्वीही कामाबद्दल तक्रारी केल्यामुळे 'बघून घेतो' अशी धमकी मिळाल्याचे सांगितले.या घटनेची माहिती मिळताच भूम पोलिसांनी रुग्णालयात जाऊन जखमी बजरंग कोळेकर यांची चौकशी करून जवाब नोंदवण्यात आला आहे. पोलिसांकडून तक्रार नोंदवून घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

याप्रकरणी भूम पोलिस ॲक्शन मोडवर आल्याची दिसून येत आहे .या "घटनेमागील नेमकी वस्तुस्थिती आणि सखोल चौकशी केल्यानंतरच गुन्हा दाखल केला जाईल," असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले असून, दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी शेतकरी ग्रामस्थांमधून जोर धरू लागली आहे.

बालाघाटावर सध्या पवनचक्की प्रकल्प उभरणा-या कंपन्यांचे पेव फुटले असुन परराज्यातील कंपन्या स्थानिक दलालांना हाताशी धरून अशिक्षित शेतकऱ्यांना लालुच दाखवून त्यांची दिशाभूल करून जमिनी ताब्यात घेत असुन पोलिस प्रशासनाच्या बळाचा गैरवापर करत दमदाटी करण्याचा प्रयत्न करत आहेत तसेच राजकीय लोकांचे कार्यकर्ते यांच्या मार्फत दबाव तंत्राचा वापर जमिनी बळकावण्यासाठी करत असल्याच्या तक्रारीत वाढ झाली आहे. राजकीय शक्तींचा वापर करून शेतकऱ्यांना खोटे गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या देत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. शेतक-यांच्या पाठीशी उभे राहण्याऐवजी आर्थिक लाभापोटी कंपन्यांची पाठराखण करताना दिसुन येत असल्याची खंत  शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

Post a Comment

0 Comments