बीडच्या माजी उपसरपंच बर्गे आत्महत्या प्रकरणी नर्तिका पुजा गायकवाड यांची जेलमध्ये रवानगी -Puja Gaikwad Barshi Court
सोलापूर प्रतिनिधी/ रुपेश डोलारे : गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्यातील गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. बीड जिल्हातील लुखामसला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी नर्तकी पूजा गायकवाड (Pooja Gaikwad)सोबत असलेल्या प्रेम प्रकरणातून स्वत:ला संपवले. गोविंदने पूजाच्या घराबाहेरच उभ्या केलेल्या गाडीत स्वत:ला गोळी मारुन घेतली. त्यांच्या आत्महत्येने बीड जिल्ह्यात खळबळ माजली. आता या प्रकरणात मोठी माहिती समोर येत आहे. नर्तकी पूजा गायकवाडच्या अडचणीत वाढ झाली आहे. या प्रकरणातील शोषित आरोपी नर्तिका पूजा गायकवाड तिला पाच दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर बार्शी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. पाच दिवसांच्या कोठडीत असून देखील पोलिसांच्या हाती अपेक्षित धागेद्वारे लागले नसल्याने तपासाचा फोकस आता आर्थिक व्यवहार, गुन्हा मध्ये वापरण्यात आलेली पिस्टल आणि बेकायदेशीर कला केंद्रावर केंद्रित करण्यात आला आहे.
बार्शी न्यायालयाने दिला निकाल
गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणी संशयित आरोपी नर्तिका पूजा गायकवाडला आत्तापर्यंत 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. पाच दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर आज अखेर न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. गोविंद बर्गे आणि पूजा गायकवाड या दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर बार्शी न्यायालयाने हा निकाल जाहीर केला आहे.
माजी उपसरपंच गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरण नेमकं काय?
एका कला केंद्रात गोविंद बर्गे आणि पूजा गायकवाड यांची पहिली भेट झाली होती. त्यानंतर गोविंद आणि पूजामध्ये चांगली मैत्री झाली. हळूहळू या मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले. गोविंद हा विवाहीत आहे, त्याला एक मुलगा आहे हे माहिती असूनही पूजासोबत त्याचे प्रेम प्रकरण सुरु होते. गोविंदने पूजाला अनेक महागडी गिफ्ट्स दिले होते. त्यानंतर त्याने गेवराई येथे एक भव्य बंगाल उभारला होता. या बंगल्यात गोविंद त्याची पत्नी, मुले आणि वडिलांसोबत राहत होता. हा बंगला पूजाला आवडला. तिने तो नावावर करुण देण्याचा हट्ट केला. गोविंदला ते शक्य नव्हते. पूजाने शेवटी त्याला धमकी दिली, तिने बोलणं देखील बंद केलं. गोविंदने बरेच प्रयत्न केले शेवटी त्याने टोकाचे पाऊल उचलले.
माजी उपसरपंच बर्गेच्या बळीने कला केंद्राचे प्रकरणी ऐरणीवर
माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांच्या आत्महत्या प्रकरणातील आरोपी लोककला नाटकाला केंद्रावरील नर्तिका पुजा गायकवाड च्या नावामुळे वाशी तालुक्यातील पिंपळगाव(क) येथील तुळजाई सांस्कृतिक लोकनाट्य कला केंद्र राज्यात चर्चेत आले आहे . या लोकनाट्य केंद्रावर वाशी पोलिसांनी केलेल्या तपासणी अनेक गैरमार्ग व अवैधरित्या बाबी समोर आली आहेत. या अहवालावरून वाशी तहसीलदाराने या लोककला नाट्य केंद्राचा परवाना रद्द केला होता परंतु या परवाना निलंबनाच्या आदेशास अप्पर जिल्हा दंडाधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी यांनी स्थगिती देत पुन्हा अहवाल मागविला या संपूर्ण प्रकारामुळे निलंबनाची स्थगिती देण्याचा निर्णय संशयतेच्या भोवऱ्यात सापडला असून पोलिसांचा स्वयं स्पष्ट नियम भंग करणारा अहवाल असूनही पुन्हा नव्याने तपासणी नेमके काय साध्य केली जाते याबाबत चर्चा होत आहे.
माजी उपसरपंच बर्गे यांनी वैराग पोलीस ठाणे अंतर्गत गावात लोककला नाट्य केंद्रावरील नर्तिकीच्या घरासमोर पाच दिवसांपूर्वी स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या केली होती. ज्या पूजा गायकवाड या नर्तिकेच्या घरासमोर बर्गे यांनी आत्महत्या केली ती वाशी तालुक्यातील पिंपळगाव येथील तुळजाई सांस्कृतिक लोककला नाट्य केंद्रावर नर्तिकी म्हणून होती. याच ठिकाणी बर्गे व पूजेची ओळख झाल्याची माहिती समोर येत असून या निमित्ताने या कला केंद्रात अनागोंदी ही समोर येत आहे या कला केंद्रावर वाशी पोलिसांनी फेब्रुवारी 2025 मध्ये अचानक तपासणी करून तेथे निर्धारित वेळेपेक्षा जास्त काळ नाचगांणे, सुरू असल्याचे पारंपारिक वाद्य ऐवजी डीजेचा वापर बेकायदेशीर दारू विक्री महिलांचे नाचगाणी आदी गंभीर बाबी समोर आणत कला केंद्राचा परवाना निलंबनाच्या बाबतचा अहवाल वाशी तहसीलदार यांच्याकडे सादर केला होता. धाराशिव ते बीड मार्गावरील लोकनाट्य कला केंद्र सातत्याने वादाची केंद्र राहिली होत आहेत. महिनाभरापूर्वी दिनांक पाच ऑगस्ट रोजी कळंब तालुक्यातील चोराखळी येथील महाकाली लोकनाट्य केंद्रात दोन गटात तुंबळ हाणामारीची घटना घडली होती यावेळी कला केंद्रात गोळीबार करण्यात आल्याने एक जण जखमी झाला होत याप्रकरणी येरमाळा पोलीस ठाण्यात गुन्हाही नोंद आहे त्यामुळे हे लोकनाट्य कला केंद्र सध्या वादाची विषय ठरली आहेत एकंदरीत माजी उपसरपंच बर्गे यांच्या आत्महत्या पासून धाराशिव सोलापूर जिल्ह्यातील कला केंद्राची प्रकरणी ऐरणीवर आल्याचे दिसून येत आहे.

0 Comments