शहापूर जिल्हा परिषद मतदार संघाचा कायापालट होणार! लोककलावंत दयानंद काळुंके यांची शहापूर मतदार संघात जोरदार चर्चा सुरू.
---------------------------------------------
काँग्रेस पक्षाने संधी दिली तर संधीचे सोनेच करणार..... दयानंद काळुंके
---------------------------------------------
इटकळ (दिनेश सलगरे):- तुळजापूर तालुक्यातील शहापूर जिल्हा परिषद मतदार संघ हा तालुक्यात लक्षवेधी मतदार संघ म्हणून ओळखला जातो,या अगोदरच्या पंचवार्षिकमध्ये शहापूर मतदार संघात ओबीसी महिला आरक्षण होते,
२०२५ च्या पंचवार्षिक मध्ये शहापूर मतदार संघात आरक्षण कोणते पडणार यावर गेल्या एक वर्षापासून मतदार संघात चर्चा होती,
नुकतीच जि प,व पं समीतीच्या आरक्षण सोडतीमध्ये शहापूर मतदार संघ हा अनुसूचित जातीसाठी पडला असुन शहापूर जिल्हा परिषद मतदार संघात लोककलावंत दयानंद काळुंके यांची जोरदार चर्चा सुरू आहे.
दयानंद काळुंके हे १९९३ च्या प्रलयंकारी भुकंपापासुन आजतागायत विविध संस्था संघटनेच्या माध्यमातून शहापूर मतदार संघात त्यांनी विविध सामाजिक कार्य केले आहे,शेकडो बचत गटाची निर्मीती करुन हजारो महिलांना महिला सक्षमीकरणाचे धडे देऊन अनेक महिलांना उद्योग व्यवसाय सुरू करुन दिला आहे, कलाकार म्हणून महाराष्ट्रीयन लोक कलेचा आधार घेत त्यांनी शहापूर मतदार संघात प्रबोधन व जनजागृतीचे कार्य केले आहे,तर पत्रकारीतेत त्यांनी शहापूर मतदार संघात सकारात्मक व शोध पत्रकारिता करीत जनतेला आपल्या लेखणीतून न्याय देण्याचे काम दयानंद काळुंके हे करीत आहेत,१९९३ चा भुकंप असो व २०१९/२० ची कोरोनाची लाट असो, यावेळी डोक्यावर मोरपिसाचा टोप घालून घाबरलेल्या लोकांना अभय दिला तर कोरोनामध्ये दहा गावात वासुदेव होऊन कोरोनापासुन सावध राहण्याचा प्रतिबंधक सल्ला त्यांनी दिला आहे तसं दयानंद काळुंके हे सामाजिक क्षेत्रात,पत्रकारीता,कलाकारीता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करतात व २०१२ मध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत नंदगाव मतदार संघात जाऊन पंचायत समितीची निवडणूक लढवली होती,केवळ चाळीस मतानी पराभव पत्करावा लागला
त्यामुळे तसा निवडणूकीचा अनुभव आहे,आता होणा-या निवडणुकीत शहापूर मतदार संघाचा कायापालट हा लोककलावंत दयानंद काळुंके यांच्या माध्यमातून होईल अशी आशा शहापूर मतदार संघातील नागरीकांना वाटत आहे व मतदार संघात दयानंद काळुंके यांच्या नावाची चर्चा जोरदार सुरू आहे.लोकशाहीमध्ये मतदार हा राजा असतो त्याच्या मनात आलं तर बदल हा निश्चितच असतो, शहापूर मतदार संघातील जनतेने मला आजपर्यंत विविध सामाजिक कार्यात,पत्रकारीतेत,संस्थेचे कार्य करताना व लोककलेमध्ये सहकार्य व आशिर्वाद दिला आहे,जनतेला मी मतदार संघात उभं रहावं,काम करावं असं वाटत असेल तर त्यांच्यासमवेत काम करण्याची संधी मी सोडणार नाही,जनतेनी संधी दिलीच तर शहापूर जिल्हा परिषद मतदार संघाचा कायापालट करेन असे ही बोलतांना सांगितले. निश्चितच एक उच्च शिक्षित सर्व सामान्यांना नेहमीच मदतीचा हात देणारे लोक कलेच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणारे दयानंद काळुंके यांना काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली तर नक्कीच शहापूर जिल्हा परिषद मतदार संघावर निर्विवाद वर्चस्व सिद्ध होईल असे सर्व सामान्य नागरिकातून बोलले जात आहे.

0 Comments