फ्रेशर्स पार्टीमध्ये नाचताना धक्का लागल्याच्या कारणावरून कॉलेज तरुणाची थरारक हत्या- लातूर येथील महाविद्यालयातील घटना
लातुर/प्रतिनिधी रुपेश डोलारे :मागील काही दिवसांपासून लातूर जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटना वेगाने वाढताना दिसत आहेत. अगदी क्षुल्लक कारणावरून थेट हत्येचे प्रकार घडत आहेत. आता पुन्हा एकदा किरकोळ कारणातून एका कॉलेजच्या तरुणाचा(College Student Murder)खून केल्याची घटना समोर आली आहे. फ्रेशर्स पार्टीत डान्स करत असताना धक्का लागल्याच्या कारणातून एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. यातच तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. हत्येची ही घटना उघडकीस येताच कॉलेज प्रशासनात खळबळ उडाली आहे.
मागील भांडणाची कुरापत काढत बाहेरच्या मित्रांना बोलावून घेत वेळुच्या काठीने केलेल्या बेदम मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या एका महाविद्यालय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना(Latur City Incident) शनिवारी दिनांक 11 रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास घडली आहे. उपचारादरम्यान (Treatment died)मृत्यू पावलेल्या महाविद्यालयीन तरुणाचे नाव सुरज धोंडीराम शिंदे वय (23) राहणार एलआयसी कॉलनी लातूर असे आहे.
या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, मयत सुरज हा डीएमएलटी च्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत होता मंगळवारी दिनांक 7 रोजी त्याच्या महाविद्यालयातील नवीन विद्यार्थ्याच्या(Frsher Student Functions) स्वागताचा कार्यक्रम होता. यामध्ये नाचताना धक्का लागल्याच्या कारणावरून व मागील मागील भांडणाची कुरापत काढून चौघा जणांनी दोन विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केली.मयत सुरज शिंदे याचा मित्र आरिफ शेख राहणार (औराद शहाजानी ता. निलंगा) यांनी सुरज शिंदे याला सांगितले माझे आणि रेहान शेख यांचे गेल्या वर्षी भांडण झाले होते आज रेहान शेख याला आपण बघून घेऊ ;असे सांगितल्यावर सुरज शिंदे यांनी भांडणास नकार दिला आज वाद घातला तर महाविद्यालयातून(College Student) काढून टाकतील असे सांगितले. तरीही आरिफ शेख यांनी रेहान शेखला नाचताना धक्का मारला .त्यावेळी रेहान शेख व इम्रान पटेल उर्फ पठाण यांनी आरिफ शेख व सुरज शिंदे यांना तुम्हाला भांडण करायचे आहे का अशी विचारले त्यानंतर रेहान शेख व इमरान पटेल उर्फ पठाण हे दोघे महाविद्यालयातून बाहेर पडले दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास सुरज शिंदे व त्याचा मित्र आदित्य मनेशी गायकवाड राहणार( 19 गायत्री नगर लातूर) हे दोघे महाविद्यालयातून बाहेर पडले.
महाविद्यालयाबाहेर आरोपी रेहान शेख व इम्रान पटेल उर्फ पठाण यांनी बाहेरून आणलेले दोन तरुण हातात वेळुच्या काठ्या घेऊन थांबले होते. आरोपी (Accuse) इम्रान पटेल उर्फ पठाण व बाहेरून आलेल्या दोघांनी सुरज शिंदे व आदित्य गायकवाड यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली .दोघा अज्ञात तरुणांनी आणि हातातील वेळूच्या काठीने सुरज व आदित्य यांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. यात आदित्य गायकवाड यांच्या हाताचे हाड मोडले(Hand Fracuture) तर सुरज शिंदे यांच्या डोक्याला गंभीर मार लागला या घटनेनंतर चौघेही पळून गेले तेथील लोकांनी सुरज शिंदे याला सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले तेथे उपचार सुरू असताना शनिवार दिनांक 11 रोजी सकाळी सात वाजता सुमारास सुरज शिंदे यांचा मृत्यू झाला . याप्रकरणी बुधवारी दिनांक 8 रोजी आदित्य गायकवाड यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात आरोपी रियान शेख ,इम्रान पठाण उर्फ पटेल व अन्य दोघाविरूध्द मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता उपचार घेणाऱ्या सुरज शिंदे यांचा मृत्यू झाल्याने खुनाच्या कलमात (Murder Section) वाढ करण्यात आली आहे या प्रकरणाचा अधिक तपास एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुरेश करत आहेत.
पंधरा दिवसात घडल्या तीन खुनाच्या घटना
लातूर शहरात मागील पंधरा दिवसापासून गुन्हेगारीच्या घटनेने वर तोंड काढण्याची दिसून येत आहे गुन्हे करणारे आरोपी हे विसीच्या आतले असल्याचे दिसून येते मागील पंधरा दिवसांपूर्वी शहरातील अहिल्यादेवी होळकर चौकात मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास प्रवासी घेतल्याच्या कारणावरून दोघा रिक्षा चालकांनी एकाचा खून केला होता त्यानंतर एका शिक्षकाकडून पैसे व मोबाईल काढून घेण्याच्या कारणाने चाकूने भोसकून मेघराज नगर मध्ये खून झाला होता त्यानंतर महाविद्यालयांतरणाच्या मारहाणीत उपचार घेणाऱ्या तरुणाचा मृत्यू झाल्याने चार जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे मागील १५ दिवसात खुनाची तिसरी घटना आहे.यामुळे लातूर शहरातील कायदा सुव्यवस्थेचा (Latur City) प्रश्न सणासुदीच्या काळात ऐरणीवर आला आहे.

0 Comments