येवती पंचायत समिती गणातून भाजपा कडून सौ.श्रीदेवी कमलाकर रणदिवे यांच्या नावाची जोरदार चर्चा.
"""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
भाजपाने संधी दिली तर संधीचे सोनेच करणार..... सौ. श्रीदेवी रणदिवे.
"""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
इटकळ (दिनेश सलगरे):- स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका अगदी दोन महिन्यावर येऊन ठेपल्या आणि तालुक्यातील सर्वच मतदार संघात जो तो आपणालाच उमेदवारी मिळावी यासाठीच धडपडत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. शहापूर गटातील येवती पंचायत समिती गण हा पुन्हा सलग दुसऱ्यांदा एस.सी. महिला प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. या येवती पंचायत समिती गणातून मौजे हिप्परगा ताड येथील सामाजिक कार्यातून ज्यांनी गाव परिसरात ओळख निर्माण केली असे सामाजिक कार्यकर्ते कमलाकर रणदिवे यांच्या पत्नी सौ.श्रीदेवी कमलाकर रणदिवे या येवती पंचायत समिती गणातून भाजपा पक्षाकडून निवडणूक लढवणार असल्याची जोरदार चर्चा येवती गणात दिसून येत आहे. सामाजिक कार्यकर्ते कमलाकर रणदिवे यांच्या सोबत पत्नी सौ. श्रीदेवी रणदिवे याही सामाजिक कार्यात नेहमीच तत्पर असतात येवती पंचायत समिती गणातील त्यांचा मोठा जण संपर्क असल्यानेच त्यांना भाजपा कडून उमेदवारी मिळणार असल्याचे बोलले जात आहे. सौ . श्रीदेवी कमलाकर रणदिवे यांचीशी संपर्क साधला असता त्यांनी सर्व सामान्यांना वाड्या वस्त्या पर्यंत शासकीय योजनेचा मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणार असल्याचे सांगत येवती पंचायत समिती गणातून भाजपने जर उमेदवारी दिली तर सर्व ताकदीनिशी निवडणूक लढवणार असल्याचे ही सौ. श्रीदेवी कमलाकर रणदिवे यांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

0 Comments