धाराशिव -आधुनिक लहुजी सेनेचा चौथा वर्धापन दिन उत्साहात संपन्न,-Dharashiv Live News Daily

Hot Posts

6/recent/ticker-posts

धाराशिव -आधुनिक लहुजी सेनेचा चौथा वर्धापन दिन उत्साहात संपन्न,-Dharashiv Live News Daily

धाराशिव -आधुनिक लहुजी सेनेचा चौथा वर्धापन दिन उत्साहात संपन्न,-


 

धाराशिव /प्रतिनिधी रूपेश डोलारे :आधुनिक लहुजी सेना या समाजसेवी संघटनेचा चौथा वर्धापन दिन धाराशिव येथील आर्यन फंक्शन हॉल मध्ये मोठ्या उत्साहात पार पडला. या वेळी “अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण — अंतिम लढा विचार मंथन परिषद” या विषयावर भव्य परिषद आयोजित करण्यात आली होती.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थापक आ. नगिनाताई सोमनाथभाऊ कांबळे या होत्या, तर प्रमुख पाहुणे म्हणून तुळजापूर विधानसभेचे लोकप्रिय आमदार राणा जगजीतसिंह पाटील हे उपस्थित होते.


या प्रसंगी आमदार पाटील साहेब म्हणाले की,“मातंग समाज हा मेहनती, प्रामाणिक आणि सामाजिक भान असलेला समाज आहे. आरक्षण वर्गीकरणासाठी नेमलेल्या बदर समितीचा पाठपुरावा करून हे वर्गीकरण लवकरात लवकर लागू करण्यासाठी मी स्वतः प्रयत्न करेन. समाजाच्या प्रश्नांसाठी विधानसभेत ठामपणे आवाज उठवू.”तसेच त्यांनी आधुनिक फकीरा सोमनाथभाऊ कांबळे यांच्या कार्याची प्रशंसा करत “आधुनिक लहुजी सेनेमुळे मातंग समाजाला विश्वासार्ह आणि स्वाभिमानी नेतृत्व मिळाले आहे” असे नमूद केले.कार्यक्रमादरम्यान अध्यक्षीय भाषणात आ. नगिनाताई कांबळे यांनी काही महत्वाच्या नियुक्त्यांची घोषणा केली.

यामध्ये लक्ष्मणभाऊ क्षीरसागर यांची प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती तर मृणालभैया कांबळे यांची संस्थापक कार्याध्यक्ष म्हणून नियुक्ती या औचित्याने सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, पर्यावरण, मानवी हक्क आणि सेवा क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी “संघर्ष योद्धा समाज भूषण पुरस्कार” प्रदान करण्यात आला.या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आधुनिक लहुजी सेना धाराशिव जिल्हा कार्यकारिणीने विशेष परिश्रम घेतले.


✳️ संघर्ष योद्धा समाज भूषण पुरस्कार विजेते:

प्रा. डॉ. मनोज डोलारे, दिलीप म्हेत्रे, गुरुलिंग स्वामी, दत्ता पेठे, अनिल आगलावे, शहाजी जाधव, सुनिल क्षीरसागर, महेश कणसे, प्रा. गुरप्पा शेटगार, प्रशांत थोरात, सुरेंद्र कांबळे, श्रावण कसबे, ओंकार बंडगर, महेश अष्टे, किसन देडे, अशोक इरपतगिरे, दत्ताभाऊ बाबर, नामदेव काशिद, अशोक तांबे आणि सुरज सगट.



Post a Comment

0 Comments