धाराशिव जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत करण्यात यावी -अखिल भटक्या विमुक्त जाती जमाती महासंघाचे महाराष्ट्र राज्य सचिव श्री. तांबोळी मकबुल आल्लाउद्दीन यांचे मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापूर प्रतिनिधी/ रुपेश डोलारे: मागील पंधरा दिवसांमध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी पाऊस झाल्यामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात मुस्कान झाले आहे त्यामुळे जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत तात्काळ देण्यात यावी अशी मागणी अखिल भटक्या विमुक्त जाती जमाती महासंघाचे महाराष्ट्र राज्य सचिव श्री. तांबोळी मकबुल आल्लाउद्दीन यांनी तहसीलदार तुळजापूर यांच्यामार्फत मुख्यमंत्र्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की ,धाराशिव जिल्ह्यात ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतीसह पशुधनाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी. अतिवृष्टीमुळे धाराशिव जिल्ह्यात यंदा खरीप हंगामातील सोयाबीन, उडीद, मुग, कांदा, मका यासह ऊस व विविध पिकांचे मोठ्या प्रमाणावर पाणी साचून पिके जाग्यावर कुजून नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्य सरकाराने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून मदत द्यावी. तसेच सरसकट कर्जमाफी द्यावी, शेतकरी पाल्याची माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षणाची फिस माफ करावी. उच्च शिक्षण घेणाऱ्या शेतकरी मुलांच्या फिसमध्ये सवलत द्यावी. शेतमालास योग्य दर द्यावा. विद्यार्थ्यांना मोफत एसटी प्रवास सवलत द्यावी, शेतकऱ्यास 50 हजार रुपये प्रती हेक्टर प्रमाणे मदत द्यावी.

 सर्व शेतकऱ्यांचे वीजबिल सरसकट माफ करावे. शेतकऱ्याने खाजगी व सरकारी बँकेतून घेतलेले कर्ज सरसकट माफ करावे तसेच शेतकऱ्यांनी सावकाराकडून वैयक्तिक व्याजदरावर घेतलेले पैसे वेळेवर परतफेड न करू शकल्यामुळे जर सावकार शेतकऱ्यांना त्रास देत असेल तर अशा सावकारावर तात्काळ गुन्हा दाखल करून नंतर त्या सावकाराची चौकशी करावी.

अशी अखिल भटक्या विमुक्त जाती जमाती महासंघाचे महाराष्ट्र राज्य सचिव श्री. तांबोळी मकबुल आल्लाउद्दीन यांनी तुळजापूर तहसिलदार मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. देवेद्रजी फडणवीस साहेब यांना निवेदनाद्वारे मागणी केली.

Post a Comment

0 Comments