तुळजापूर: चिवरी येथील शोभाबाई किसन गवळी या शेतकरी महिलेस महिलेचा सर्पदंशाने दुर्दैव मृत्यू
चिवरी : तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील शोभाबाई किसन गवळी यांचा सर्पदंशाने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दि, ११ रोजी घडली आहे. या घटनेबाबत अधिक माहिती अशी की चिवरी येथील शेतकरी महिला शोभाबाई गवळी वय (५०) या दि, ७ रोजी शेतामध्ये काम करत असताना त्यांना सर्पदंश झाला, यानंतर त्यांना उपचारासाठी सोलापूर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा आज दिनांक ११ रोजी दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या पार्थिवावर उद्या रविवार दिनांक 12 रोजी सकाळी 11:30 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे .त्यांच्या पश्चात पती,एक मुलगा, सून व नातवंडे असा परिवार आहे. या दुर्देवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

0 Comments