शिर्डी : साई चरणी 660 ग्रॅमचे सुवर्ण ताट अर्पण तब्बल 74 लाख 49 हजार 393 रुपये ताटाची किंमत-Saibaba Gold Tat Arpan gram

Hot Posts

6/recent/ticker-posts

शिर्डी : साई चरणी 660 ग्रॅमचे सुवर्ण ताट अर्पण तब्बल 74 लाख 49 हजार 393 रुपये ताटाची किंमत-Saibaba Gold Tat Arpan gram

शिर्डी : साई चरणी 660 ग्रॅमचे सुवर्ण ताट अर्पण तब्बल 74 लाख 49 हजार 393 रुपये ताटाची किंमत-Saibaba Gold Tat Arpan gram

शिर्डी: श्रद्धा भक्ती आणि साई प्रेम यांचा अनोखा संगम आज शिर्डीत पहिला मिळाला ठाणे मुंबई येथील साईभक्त धरम कटारिया यांनी आपल्या अखंड भक्तीभावातून श्री साईबाबांच्या चरणी 660 ग्रॅम वजनाची आकर्षक सुवर्ण ताट अर्पण केले. तब्बल 74 लाख 49 हजार 393 किमतीचे हेच सुवर्ण ताट साई भक्तीचे प्रतीक ठरले असून या भक्तीचा गौरव श्री साईबाबा संस्थानचे(Saibaba Trust) मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सत्कार करून व्यक्त केला.

श्री साईबाबा वर लाखो भक्तांचे अखंड श्रद्धा आहे याच श्रद्धेचा भावनेतून भाविक श्री साईबाबांना विविध दान अर्पण करत असतात आज ठाणे मुंबई येथील हीर रियालिटी व्हेंचर प्रायव्हेट लिमिटेडचे साईभक्त (Saibhakt)धरम कटारिया यांनी श्री साई चरणी 660 ग्रॅम वजनाची आकर्षक सुवर्ण ताट अर्पण केले या सुवर्ण ताटाची किंमत 74 लाख 49 हजार 393 रुपये असून ते श्री साईबाबा संस्थानचे(Saibaba Trust)  मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्षक गाडीलकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. श्री साईबाबांच्या चरणी सुवर्ण ताट अर्पण केल्यानंतर साईबाबा संस्थानच्या वतीने गोरक्ष गाडीलकर यांनी देणगीदार कटारिया यांचा सत्कार करून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आभार व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments