/> class='adsbygoogle' data-ad-client='ca-pub-7797085685451885' data-ad-format='fluid' data-ad-layout='in-article' data-ad-slot='7304658765' style='display:block; text-align:center;'/> पुणे : मागील २८ वर्षापासून न्याय मिळत नसल्याने ज्येष्ठ नागरिकांची न्यायालयातच आत्महत्या चौथ्या मजल्यावर घेतली उडी

Hot Posts

पुणे : मागील २८ वर्षापासून न्याय मिळत नसल्याने ज्येष्ठ नागरिकांची न्यायालयातच आत्महत्या चौथ्या मजल्यावर घेतली उडी

पुणे : मागील २८ वर्षापासून न्याय  मिळत नसल्याने ज्येष्ठ नागरिकांची न्यायालयातच आत्महत्या चौथ्या मजल्यावर घेतली उडी


पुणे : जमीन विषयी खटल्यात गेल्या 28 वर्षापासून न्याय मिळत नसल्याच्या नैराश्यातुन एका ज्येष्ठ नागरिकांनी बुधवारी दिनांक १५ ऑक्टोंबर रोजी सकाळी शिवाजीनगर न्यायालयाच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली या धक्कादायक घटनेमुळे न्यायालयात परिसरात एकच खळबळ  उडाली या आत्महत्या मुळे सामान्यांना न्यायासाठी लागणारे विलंबाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर  आला आहे.

या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, की नामदेव यशवंत जाधव वय (61) रा. वडकी हडपसर ) हे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे त्यांचे 1997 सालापासून जमीन विषयक वाद सुरू होते तेव्हापासून न्यायालयात हे प्रकरण न्यायप्रविष्ठ होते ; मात्र दीर्घकाळ न्यायालयाने प्रक्रिया सुरू असूनही या खटल्याचा निकाल लागत नव्हता त्यामुळे ते तणावाखाली होते . जाधव बुधवारी सकाळी शिवाजीनगर येथे न्यायालयात आले होते. न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून जाऊन त्यांनी उडी मारली या घटनेत गंभीर जखमी झाले. या प्रकाराची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले त्यांनी तातडीने जाधव यांना ससून रुग्णालयात उपचारासाठी हलवले मात्र ते मरण पावले असल्याचे वैद्यकीय तपास स्पष्ट झाले  या घटनेमुळे न्यायालयाच्या परिसरात मोठी गर्दी झाली होती घटनेचा पंचनामा करण्यात आला असून  शिवाजीनगर पोलीस ठाण्यात या संदर्भात आकस्मिक  मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

आत्महत्येनंतर या जेष्ठ नागरिकांच्या खिशात एक चिठ्ठी मिळाली त्यात वडिलांनी कोणतीही जमीन दिली नाही वडिलोपार्जित जमिनी विरोधात 1997 मध्ये दावा दाखल केला होता, त्यांच्या नावावर काही नाही घरच्यांनीही काही दिले नाही. न्यायालयातही   न्याय मिळत नाही या नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती पुढे आली आहे.

" महेश बोळकोटगी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजीनगर पोलीस ठाणे. 

Post a Comment

0 Comments

atOptions = { 'key' : '1f63728d2726b37f11c555e62556cd8d', 'format' : 'iframe', 'height' : 50, 'width' : 320, 'params' : {} }; src='https://pl29801966.effectivecpmnetwork.com/82/79/35/827935d982e90ce2142e7c297a587ef9.js'/>