अंबाजोगाईच्या येथील प्रेमियुगलानी लातुरात केली गळफास घेऊन आत्महत्या नातेवाईकांनी प्रेमाला विरोध केल्याने उचलले टोकाचे पाऊल-
लातूर / प्रतिनिधी रुपेश डोलारे: मागील पाच वर्षापासून प्रेम संबंध असतानाही लग्नाच्या रेशीमगाठी जुळवण्यास नातेवाईकातूनच विरोध होत असल्याने लातुरमध्ये भावकीतील प्रेमीयुगलाने जीवन यात्रा संपवली. लातूर जवळील पेठ शिवारात लातूर - औसा रस्त्याच्या कडेला असलेल्या एका गोठ्यात दोघांनी गळफास लावून आत्महत्यामुळे(Suicide) केली ही घटना रविवार दिनांक 19 रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. आत्महत्या केल तरुणी येथील एका खाजगी वैद्यकीय महाविद्यालयात परिचारिका म्हणून काम करत होती तर मयत प्रियकर हा स्पर्धा परीक्षा तयारी करत होता. नितीन संदिपान दराडे वय (29) वर आणि मलबा दराडे वय (24) दोघेही राहणार दरडवाडी तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड अशी गळफास लावून मृत्यू पावलेल्या प्रेमी मुलाची नावे आहेत. मयत नितीन दराडे आणि राणी दराडे हे दोघेही लातूर येथे वास्तव्यास होते.
या घटनेबाबत अधिक माहिती अशी की अंबाजोगाई तालुक्यातील दरडवाडी येथील नितीन संदिपान दराडे व राणी मलबा दराडे हे दोघे लातूर येथे वास्तव्यास होते या दोघांनी नातेवाईकांनी प्रेमाला विरोध दर्शवत असल्याने दिनांक 19 रोजी गळफास लावून आत्महत्या केली. मागील काही वर्षांपूर्वी नितीन दराडे यांचा अपघात झाल्याने त्याचा पाय मोडला होता त्यामुळे त्यांना कायमचे अपंगत्व आले होते. नितीन व राणी हे दोघेही एकाच गावचे भावकितील होते. मागील पाच-सहा वर्षांपूर्वी दोघांचे प्रेम संबंध जुळले होते दोघांनीही एकमेकांसोबत राहण्याच्या आणा-भाका खाल्या होत्या परंतु त्यांच्या विवाहाला नातेवाईक भावकीतील तीव्र विरोध होत होता यामुळे ते दोघे विवाह करू शकत नव्हते शनिवारी दोघेही रात्री दहाच्या सुमारास लातूर येथून औसा रस्त्याने पेठ शिवारात गेली तेथे रस्त्याच्या कडेला असलेल्या झोपडीपुढील जनावराच्या गोठ्यात दोघांनीही गळफास लावून आत्महत्या केली. याप्रकरणी लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. लातूर ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल ज्ञानोबा गुडमेवाड हे अधिक तपास करत आहेत.नितीन अपंगत्वावर मात करून स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न करत होता, तर राणी वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत होती. तरीही, समाजातील दडपण आणि कुटुंबीयांच्या विरोधामुळे त्यांनी घेतलेल्या या निर्णयाने हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेमुळे रविवारी संपूर्ण गावात चूल पेटली नाही, कारण दोघांच्या अंत्यसंस्कारासाठी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. लातूर ग्रामीण पोलिसांत याप्रकरणी आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
रविवारी दिनांक 19 रोजी सकाळी शेतकरी गोठ्यात येतात दोघांचेही मृतदेह गोठ्यात लटकत असल्याचे दिसून आले शेतकऱ्यांनी तात्काळ पेठच्या पोलीस पाटलांना सदर घटनेची माहिती दिली पोलीस पाटलांनी लातूर ग्रामीण पोलीस ठाण्याशी संपर्क करून घटना कळवली लातूर ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्यासह त्यांच्या टीमने घटनास्थळी जाऊन दोन्ही मृतदेह रुग्णवाहिकेतून लातूरच्या शासकीय रुग्णालयात हलवले घटनास्थळी ठसे तज्ञानाही पाचारण करण्यात आले होते.

0 Comments