मौजे सराटी येथे विद्युत तारेच्या शॉट सर्किट मुळे उभा असलेला ऊस जळुन भस्मसात .-Saratti Villege News Tuljapur

Hot Posts

6/recent/ticker-posts

मौजे सराटी येथे विद्युत तारेच्या शॉट सर्किट मुळे उभा असलेला ऊस जळुन भस्मसात .-Saratti Villege News Tuljapur

मौजे सराटी येथे विद्युत तारेच्या शॉट सर्किट मुळे उभा असलेला ऊस जळुन भस्मसात .- 


"""""""""""""""""""""""""""""""""""""""""""

शेतकरी वैभव बिराजदार व सौ. रुक्मिणी परमेश्वर बिराजदार यांचे ऊस जळाल्या मुळे लाखो रुपयांचे नुकसान .

"""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""

महावितरणच्या हलगर्जी पणामुळे शेतकऱ्याच्या उसाची राख

"""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""

इटकळ (दिनेश सलगरे):- तुळजापुर तालुक्यातील मौजे सराटी येथे विद्युत तारेच्या शॉट सर्किट मुळे उभा असलेला ऊस जळुन शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान ही घटना गुरुवार दि.१६ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास सराटी शिवारात घडली. अधिक माहिती अशी की, मौजे सराटी येथील शेतकरी वैभव बिराजदार व रुक्मिणी परमेश्वर बिराजदार यांचे गट नंबर १७८ मध्ये शेत जमीन असून जवळपास पाच एकर ऊस अगदी जोमात आलेला होता पण गुरुवार दिनांक १६ ऑक्टोंबर रोजी विद्युत तारेच्या शॉट सर्किटमुळे मोठा जाळ झाला आणि उभ्या असलेला ऊसासह स्पिंकलर सट व ३०प्लास्टिक पाईप जळून भस्मसात झाले घटनेची माहिती मिळताच  लाईनमन यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी येऊन पाहणी करून पंचनामा केला यावेळी शेतकरी बिराजदार,पोलीस पाटील आनंद हिंगमिरे, उपस्थित होते.आधीच अतिवृष्टीने शेतकऱ्याचे खरीप सोयाबीन पाण्याने वाहून गेले व त्यात या महावितरणच्या गलथान कारभारामुळे शेतकऱ्यांचा उभा असलेला ऊस ही जळाला त्यामुळे शेतकऱ्याचे खूप मोठे नुकसान झाले आहे.तरी या शेतकऱ्यास महावितरण कंपनीने झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी अशी येथील शेतकरी वर्गातून मागणी केली जात आहे.


Post a Comment

0 Comments