सासरच्या छळास कंटाळून विवाहतची विष प्राशन करून आत्महत्या; पती विरुद्ध गुन्हा दाखल धाराशिव जिल्ह्यातील घटना -Crime News Dharashiv District Incident
धाराशिव/ प्रतिनिधी रुपेश डोलारे : पत्नीच्या आई-वडिलांनी पुण्यात घर घेण्यासाठी एक लाख रुपये न दिल्याने तसेच मुलगा न झाल्याच्या कारणावरून पतीकडून सतत होत असलेल्या सासरच्या छळास कंटाळून विवाहतिने राहत्या घरी विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना कळंब तालुक्यातील ईटकुर येथे दि, ५ रोजी घडली आहे याप्रकरणी पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेबाबत अधिक माहिती अशी की कळंब तालुक्यातील ईटकुर येथील विवाहिता अश्विनी बाळासाहेब शिंदे वय (31) वर्ष राहणार इटकुर तालुका कळंब या विवाहतिने दि, ५ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास ईटकुर येथील राहत्या घरी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली या प्रकरणात आरोपी पती बाळासाहेब शंकर शिंदे राहणार( ईटकुर) याने पत्नी अश्विनी यास पुण्यात घर घेण्यासाठी तुझ्या आई-वडिलांनी एक लाख रुपये न दिल्यामुळे व मुलगा न झाल्यामुळे सतत त्रास दिला या त्रासास कंटाळून अश्विनी हिने आत्महत्या केल्याची फिर्याद वसंत बाबुराव कोकाटे वय (65) वर्षे राहणार ईटकुर यांनी दिली आहे त्यानुसार दिनांक 8 रोजी कळंब पोलीस ठाण्यात पतीविरोधात आत्महत्येस प्रवर्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

0 Comments