डॉ. स्नेहा सोनाकाटे यांना अहिल्यारत्न पुरस्कार प्रदान-
तुळजापूर प्रतिनिधी / रूपेश डोलारे : सामाजिक-राजकीय कार्याची दखल घेऊन सकल धनगर समाज महाराष्ट्र राज्य आयोजित दुसरे राज्यस्तरीय धनगर अधिवेशन कार्यक्रम प्रसंगी डाँ. स्नेहा सोनकाटे यांना राजकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल "अहिल्यारत्न "पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी माझ्या मार्गदर्शिका महिला व बाल विकास आयुक्त पुणे नयना गुंडे मॅडम, इन्कम टॅक्स कमिशनर डॉ. नितीन वाघमोडे, ॲड. विजय गोफणे आदींसह मान्यवर उपस्थित होते.
ज्यांच्यामुळे माझा राजकीय प्रवास सुरू झाला ते माझे गुरू माजी खासदार डॉ. विकास महात्मे सर व ज्यांच्यामुळे मला ओळख मिळाली ते माझे गुरू ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या शुभहस्ते पुरस्कार स्वीकारण्याचे मला भाग्य मिळाले! यावेळी अतिशय मनापासून आनंद झाला .(डाँ स्नेहा सोनकाटे)

0 Comments