मौजे इटकळ येथील हॉटेल रामभरोसा यांच्या वतीने पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीस मदत-Itkal News Tuljapur Today
""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""हॉटेलचे मालक शंकर वाघमोडे यांनी जिल्हाधिकारी यांना सुपूर्त केला २१ हजार रुपयांचा धनादेश.
""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
इटकळ ( दिनेश सलगरे) :- तुळजापुर तालुक्यातील मौजे इटकळ येथील हॉटेल राम भरोसाचे मालक शंकर वाघमोडे यांनी पूरग्रस्तांना मदत व्हावी यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी २१ हजार रुपयांचा धनादेश निधी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री यांच्याकडे शुक्रवार दि.४ ऑक्टोबर रोजी पाठवला आहे.
धाराशिव जिल्ह्यात झालेल्या सततच्या अतिवृष्टीमुळे शेतकरी आणि नागरिक मोठ्या संकटात सापडले आहेत शेतीसह , व्यापार , व्यवहार आणि समाज जीवनावर नकारात्मक परिणाम झाला असून शेतकरी हवालदिल झाले आहेत उभ्या रानावरील खरीप पिके पाण्यामुळे जमीनदोस्त झाली त्यामुळे शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्न क्षणात मातीमोल झाले. त्यामुळे मौजे इटकळ येथील राम भरोसा हॉटेलचे मालक शंकर वाघमोडे यांनी आपण ही समाजाचे काही तरी देणे आहोत हा संकल्प बाळगून आपल्याही उत्पंनातून काही का होईना मदत पूरग्रस्तांना व्हावी या उदात्त हेतूने त्यांनी २१ हजार रुपयांचा धनादेश जिल्हाधिकारी यांच्या कडे सुपूर्त केला. शंकर वाघमोडे यांनी अतीशय प्रतिकुल परिस्थितीवर मात करत हॉटेल व्यवसायात त्यांनी गरुडभरारी घेतली असून विविध सामाजिक, धार्मिक कार्यक्रमातही ते सातत्याने ते मदत करतात त्यांच्या या कौतुकास्पद उपक्रमाबद्दल जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी अभिनंदन केले व शासनाच्या वतीने आभारही व्यक्त केले या पूरपरिस्थितीमुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना समाजातील दानशूर व्यक्तींनी व शासनाने दिलासा द्यावा अशी अपेक्षाही हॉटेल रामभरोसाचे मालक शंकर वाघमोडे त्यांनी व्यक्त केली. यावेळी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव, पत्रकार दिनेश सलगरे, सक्षम न्युजच्या संपादक सौ. संगीताताई काळे, शिलाताई उंबरे, चांद साहेब शेख, चेतन बंडगर, अवधूत लकडे, नागेश क्षिरसागर आदी उपस्थित होते.

0 Comments