धक्कादायक घटना : रिक्षा चालकाचा राग अनावर, प्रवाशाचा खून; दुसऱ्या रिक्षाने प्रवासी घेतल्याचा जाब विचारत अज्ञातस्थळी नेऊन संपवले -लातूर शहरातील घटना -
लातूर प्रतिनिधी /रुपेश डोलारे: माझ्या स्टॉप वरून तू प्रवाशांना रिक्षात का बसवले असा जाब विचारत रिक्षाला मागून धडक दिली. यामध्ये आतील प्रवाशांनी आम्हाला रेल्वे गाठायचे आहे असे म्हणाल्याने त्यांना चाकूने मारहाण केली . सुरुवातीला यात दोन रिक्षा चालकांमध्ये बाचाबाची होऊन आतील प्रवाशांनी आम्हाला रेल्वे स्टेशन गाटायचे आहे असे म्हणाल्याने आतील दोन प्रवाशांना दुसऱ्या रिक्षा चालकाने रिक्षात घालून दुसरीकडे नेऊन अज्ञात स्थळी मारहाण करून खून केल्याची धक्कादायक घटना लातूरच्या (Latur)अहिल्यादेवी चौक ते गरुड चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर रविवार दिनांक 28 रोजी उत्तर रात्री दीड वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी अल्पवयीन रिक्षा चालकासह त्याच्यासोबतच्या दुसऱ्या आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा (Murder offence)दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे लातूर शहर परिसरात खळबळ उडाली असून प्रवासाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
अमीर अली सय्यद वय (40) (राहणार सायगाव तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड) असे मारहाणीत मृत्यू पावलेल्या प्रवासी व्यक्तीचे नाव आहे.(Died Person) अमीर अली सय्यद हे सोलापूर येथे कामाला होते रविवारी रात्री एक वाजेच्या सुमारास त्यांच्यासह आणि चार मित्र सायगाव येथे जाण्यासाठी सोलापूरहुन लातूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात उतरले तिथून रिक्षाने अहिल्यादेवी होळकर चौकात आले बराच वेळ थांबूनही त्यांना अंबाजोगाई कडे जाण्यास वाहन मिळाले नाही पहाटे तीन वाजता परळी ला (Parali railay Station)जाणारी रेल्वे असल्याचे त्यांना रिक्षा चालकाने सांगितले यामुळे सर्वजण त्याच रिक्षात बसून रेल्वे स्थानकाकडे निघाले तेवढ्याच आरोपीच्या रिक्षाने प्रवाशांच्या(Autoriksha) रिक्शाला मागून जोराची धडक दिली माझ्या थांब्यावरून तू प्रवासी का घेत आहेत असे म्हणत त्या दोन रिक्षा चालकांमध्ये बाचाबाची झाली तेवढ्याच रिक्षात बसलेली अमीर अली सय्यद यांनी आम्हाला जाऊ द्या रेल्वे निघून जाईल असे सांगितले त्यावरून अल्पवयीन रिक्षाचालक व आरोपी समीर वय 25 यांनी मयत अमीर अली सय्यद यांना धक्काबुक्की करत चाकुने मारहाण करण्यास सुरुवात केली .
अमीर अली याच्यासोबतच्या अन्य प्रवाशांनी रिक्षा चालकाचा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यानंतर हे आरोपी रिक्षा चालकांना राग अनावर झाल्याने रिक्षातील दोघांनी अमीर अली सय्यद यांना रिक्षात बसवले त्यांना गरुड चौकाकडे नेण्यात आले त्याच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता गृहीत धरून त्या त्यासोबतच्या एकाने पोलिसांना (Police Phone) फोन केला सदरील घटनाक्रम सांगितला.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ अहिल्यादेवी होळकर चौक गाठला तेथे जाऊन रिक्षाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता अमीर अली सय्यद हे रस्त्याच्या कडेला पडलेले दिसून आले तेथून त्यांना तात्काळ शासकीय रुग्णालयात (Hospital) देण्यात आले डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले याप्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन रिक्षा चालक व त्याच्या सोबतच्या 25 वर्षे समीर याच्या विरोधात गुन्हा रजिस्टर नंबर 767/25 कलम 103 ,(1) 140,(4) 311 (3) ,(5) भारतीय न्याय संहितेनुसार(BNS) विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . विवेकानंद चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक घोडेवाड हे अधिक तपास करीत आहेत या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
दोघेही आरोपी चौकशीसाठी ताब्यात
याप्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन रिक्षा चालकास आरोपी समीर याला सोमवार दिनांक 29 रोजी दुपारी चौकशीसाठी ताब्यात घेतली आहे लातूर शहर चे(Latur City) उपविभागी पोलीस अधिकारी समरजीत सिंह साळवे यांनी आरोपीची कसून चौकशी केली.

0 Comments