अहिल्यानगरहून आलेल्या श्री तुळजाभवानीच्या पलंग पालखीचे नगर परिषदेचे मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे यांच्या हस्ते पूजन करून स्वागत
तुळजापूर प्रतिनिधी/ रुपेश डोलारे : कुलस्वामिनी च्या मंदिरातील प्रथा परंपरा शेकडो वर्षापासून आजही मोठ्या भक्ती भावाने अखंडितपणे जोपासली जात आहे; ही परंपरा जोपासण्यासाठी लागणारी पालखी व पलंग पुरवण्याचा अहिल्यानगर शहराला आहे आज दिनांक 1 ऑक्टोबर रोजी नगरपरिषद कार्यालयाच्या वतीने नगरहुन आलेल्या पलंग पालखीचे मा.मुख्याधीकारी अजिंक्य रणदिवे यांच्या हस्ते पुजन करून स्वागत करण्यात आले. यावेळी स्वच्छता निरीक्षक दत्तात्रय साळुंखे ,कार्यालयीन अधीक्षक चांगदेव ढोले, भांडारपाल बापुसाहेब रोचकरी, लेखापाल शरद पवार, सज्जन गायकवाड,मुज्जफर शेख ,सुनील पवार, प्रमोद भोजने ,जयजयराम माने,प्रशांत बुलबुले ,राम मोगरकर ,दत्ता चोपदार आदी उपस्थित होते.


0 Comments