दुर्दैवी घटना : नवरी मुलगी बघायला जाताना बहीण भावावर काळाचा घाला; नांदेड - नागपूर महामार्गावरील घटना -Nanded Accident News Tuljapur -Nagpur Roads

Hot Posts

6/recent/ticker-posts

दुर्दैवी घटना : नवरी मुलगी बघायला जाताना बहीण भावावर काळाचा घाला; नांदेड - नागपूर महामार्गावरील घटना -Nanded Accident News Tuljapur -Nagpur Roads

दुर्दैवी घटना : नवरी मुलगी बघायला जाताना बहीण भावावर काळाचा घाला; नांदेड  - नागपूर महामार्गावरील घटना -


नांदेड : नांदेड  ते नागपूर या राष्ट्रीय महामार्गावर शिल्लक राहिलेले व डागडुजीचे  काम चालू असताना महामार्गाच्या कर्मचाऱ्यांनी हलगर्जीपणा करून पर्याय रस्ता न दिल्यामुळे झालेल्या तिहेरी अपघातात चाकूर व लातूर येथील बहिण भावांचा अपघातात जागीच मृत्यू झाला तर आणि आठ जण गंभीर जखमी झाले आहेत ही दुर्घटना दिनांक 18 रोजी शनिवारी दुपारी 2 वाजेच्या सुमारास हदगाव तालुक्यातील भानेगाव फाट्याजवळ घडली या विचित्र अपघातात जागीच मृत्यू झालेल्या बहिण भावांची नावे मनोज रामराव देगुरे वय (34) व  मंजुषा देविदास आईलवार वय (37) अशी आहेत.

या घटनेबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की नांदेडहून यवतमाळ जिल्ह्यातील आरणीकडे जाणारा आयशर टेम्पो रस्त्यात काम करणाऱ्या जेसीबी वर आदळला याचवेळी याच आयशर टेम्पोच्या पाठीमागे भरधाव आलेली कार आदळली शनिवारी दिनांक 18 रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला या अपघातात कारमधील परिवार हा सॉफ्टवेअर इंजिनियर असलेल्या मनोज दिगुरे साठी मुलगी बघण्याच्या कार्यक्रमासाठी चंद्रपूरला जात होता.

 ही कार मनोज दिगुरे चालवत होता या विचित्र अपघातात मनोज रामराव दिगुरे वय (34) व मंजुषा देविदास आईलवर वय (37) या बहिण भावाचा जागीच मृत्यू झाला तर पियुष देविदास आईलवार वय (42) मंजुषा निळकंठ असेवाढ वय (40) रामराव देगुरे  वय (60) प्रतिभा देगुरे  वय (५७) दत्तात्रेय अंकुटे वय (२५) निधी आसेवाड वय (14)  शरयू असेवाड (७)  हे सर्व चाकूर व लातूर येथील रहिवासी असल्याचे समजते. तसेच आयशर टेम्पोचा चालक शाहरुख खान वय (34) राहणार खंडवा मध्य प्रदेश हा गंभीर जखमी झाला आहे..

या अपघाताची माहिती कळताच अंकुश गोडजे ,बालाजी ढोरे, राजू तावडे ,गजानन देवसकर, मिलिंद पाईकराव ,गंगाधर काळे, शंकर जळके ,अनिल देशमुख ,शुभम गलांडे यांनी तात्काळ मदत करत जखमींना उपजिल्हा रुग्णालयात हदगाव येथे आणण्यासाठी धावपळ केली. रुग्णालयात डॉ.  प्रदीप स्वामी ,डॉ. दादाजी ढगे, डॉ. बालाजी पोटे यांनी उपचार करून त्यांना नांदेड येथे हलवले  या घटनेची माहिती मिळतात पोलीस निरीक्षक संकेत दिघे यांनी तात्काळ धाव घेतली व महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली सदर अपघातास कारणीभूत ठरलेले जेसीबी  उत्खनन यंत्र महामार्गाचे काम करणाऱ्या मेन्टेनन्स मॅनेजरने तातडीने अपघात स्थळावरून सुमारे 300 मीटर नेऊन उभे केले. या घटनेमध्ये जखमी मध्ये आई वडील दोन बहिणी व लहान मुलांचा समावेश आहे त्यापैकी एका लहान मुलाला गंभीर दुखापत झाली आहे तर  उर्वरित दोघे सुरक्षित असल्याचे समजते अपघातानंतर मृत्यू हादगाव जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले तर जखमींना पुढील उपचारासाठी नांदेड येथील शासकीय रुग्णालय दाखल करण्यात आले आहे.



Post a Comment

0 Comments