बीडचे उपसरपंच गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणातील नर्तिका पुजा गायकवाड यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला-Puja Gaikwad Bail Rejected District Session Court Solapur

Hot Posts

6/recent/ticker-posts

बीडचे उपसरपंच गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणातील नर्तिका पुजा गायकवाड यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला-Puja Gaikwad Bail Rejected District Session Court Solapur

बीडचे उपसरपंच गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणातील नर्तिका पुजा गायकवाड यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला-

सोलापुर/प्रतिनिधी रूपेश डोलारे  :  प्रेमाच्या जाळ्यात ओढून नंतर अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याने बीड येथील लुखामसला गावचे उपसरपंच गोविंद जगन्नाथ बर्गे (Govind Barge Suicide) यांनी आत्महत्या केली होती. याप्रकरणातील आरोपी नर्तकी पूजा गायकवाड (Pooja Gaikwad) हिचा जामिनाचा अर्ज (Bail Application) जिल्हासत्र न्यायाधीश व्ही.एस.मलकलपत्ते-रेड्डी यांनी फेटाळून लावला. पूजा गायकवाड हिच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. न्यायालयाने जामीन फेटाळल्याने आता नजीकच्या काळात तुरुंगाबाहेर येण्याच्या पूजा गायकवाड हिच्या अपेक्षांना या निर्णयामुळे सुरुंग लागला आहे त्यामुळे नर्तिका पूजा गायकवाड हिला दिवाळी तुरुंगातच काढावी लागणार आहे.

पूजा गायकवाड हिने बंगला आणि पाच एकर जमीन नावावर कर म्हणून मानसिक त्रास दिल्याने गोविंद बर्गे यांनी सप्टेंबर महिन्यात स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली होती. पूजा गायकवाड हिला जामीन मिळाल्यास समाजात चुकीचा संदेश जाईल. याशिवाय अशा महिलांकडून इतर पुरुषांचा आर्थिक, मानसिक आणि शारीरिक छळ होण्याची शक्यता नाकारता येणार नाही, असा युक्तिवाद (Agruments)जिल्हा सरकारी वकील डॉ. प्रदीपसिंग राजपूत यांनी केला. हा युक्तिवाद मान्य करत  न्यायालयाने आरोपी पूजा गायकवाड हिचा जामीन अर्ज (Bail Rejected)फेटाळला. याप्रकरणी सरकार पक्षातर्फे डॉ. राजपूत तर आरोपीतर्फे अॅड. आर. डी. तारके यांनी काम पाहिले.

जिल्हा सरकारी वकिलांचा जोरदार युक्तिवाद

नर्तिका पूजा गायकवाड हिच्या जामीन अर्जावर सुनावणीदरम्यान जिल्हा सरकारी वकिल डॉ. प्रदीपसिंग राजपूत यांनी सरकारी पक्षातर्फे तीव्र विरोध नोंदवत जोरदार युक्तिवाद केला. संशयित आरोपी पूजाला जामीन मिळाल्यास समाजात चुकीचा संदेश जाईल. त्यामुळे अशा प्रकारच्या घटनांना खतपाणी मिळेल. न्यायालयाने हा युक्तिवाद ग्राह्य धरत पूजा गायकवाडचा जामीन अर्ज फेटाळला

उपसरपंच गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणानंतर धाराशिव जिल्ह्यातील कला केंद्रावर कारवाईचा धडाका

उपसरपंच गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणानंतर धाराशिव जिल्ह्यातील लोकनाट्य कला केंद्रांवर प्रशासनाने कारवाईचा धडाका लावला आहे. जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी कालिका आणि गौरी लोकनाट्य कला केंद्रांचे परवाने कायमस्वरूपी रद्द केले आहेत. आतापर्यंत धाराशिव जिल्ह्यातील चार लोकनाट्य कला केंद्रांवर कारवाई करण्यात आली असून तुळजाई, पिंजरा, साई, आणि कालिका या केंद्रांचे परवाने रद्द झाले आहेत. सोलापूर-धुळे महामार्गालगत असलेल्या या केंद्रांनी प्रशासनाने घालून दिलेल्या अटींचा भंग केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांनी वाढती गुन्हेगारी आणि नियमभंगाविरोधात स्पष्ट संदेश दिला आहे. 

उपसरपंच गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरण नेमके काय आहे

बीड जिल्ह्यातील लुखामसला येथील माजी उपसरपंच गोविंद बर्गे हे ठेकेदारांचा व्यवसाय करत होते त्यांच्या ओळखीतील वाशी तालुक्यातील पारगाव जिल्हा धाराशिव येथील तुळजाई कला केंद्रात काम करणारी नर्तिका पूजा गायकवाड यांच्याशी संबंध जोडले या ओळखीचे रूपांतर प्रेम संबंधात झाले पूजा गायकवाड हिने मी तुमची मालकीण म्हणून राहीन पण माझ्या घरखर्च आणि संसार पाहायचा या अटीवर गोविंद यांच्याकडून आर्थिक मदत मागितली होती तिच्या मागणीनुसार गोविंद यांनी तिला गाडी कपडे मोबाईल दागिने प्लॉट शेतजमीन दिले त्यानंतर गोविंद बर्गे यांच्याकडे गेवराई येथील बंगला तिच्या नावावर करण्यासाठी पूजा गायकवाड यांनी तगादा लावला होत परंतु गोविंद यांच्या कुटुंबीयांनी विरुद्ध दर्शविल्या नंतर तिने गोविंद यांना ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली बंगला तिच्या नावावर न केल्यास गोविंद यांच्यावर बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करून बदनामी करण्याची धमकी दिली या घटनेच्या काही दिवसांपूर्वी तिने गोविंद यांचा मोबाईल ब्लॉक करून संपर्क तोडला आणि तगादा कायम ठेवला या मानसिक छळाला कंटाळून गोविंद बर्गे यांनी 9 सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली या घटनेनंतर गोविंद यांची मेहुणे लक्ष्मण चव्हाण यांनी वैराग पोलीस ठाण्यात पूजा गायकवाड यांच्या विरोधात फिर्याद दिली.


Post a Comment

0 Comments