पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने केली पत्नीची निर्घृण हत्या, पतीनेही गळफास घेऊन जीवन संपवले-Solapur District Crime News

Hot Posts

6/recent/ticker-posts

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने केली पत्नीची निर्घृण हत्या, पतीनेही गळफास घेऊन जीवन संपवले-Solapur District Crime News

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने केली पत्नीची निर्घृण हत्या, पतीनेही गळफास घेऊन जीवन संपवले- 


सोलापूर/प्रतिनिधी रूपेश डोलारे : सोलापूर जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या विविध घटना समोर येत आहेत. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने तिची निर्घृण हत्या(murder) केली, त्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या(Suicide)  केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दक्षिण सोलापूर(West Solapur) तालुक्यातील औराद (Aurad)येथे गुरुवारी दि,२ रोजी रात्री अकरा ते पहाटे साडेपाच वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. पत्नीच्या डोक्यावर रॉडने वार करुन पतीने तिच्या गळ्यावर खुरप्याने सपासप वार करून गळा चिरून हत्या केली.

मिळालेल्या माहितीनुसार,  दक्षिण सोलापूर तालुक्यातील औराद येथे पतीने दारुच्या नशेत पत्नीवर चारित्र्याचा संशय घेतला. यानंतर दोघांमध्ये वाद झाल्यानंतर आरोपीनं(Accuse)  पत्नीच्या डोक्यात पहारीने वार केले आणि खुरप्याने गळा चिरून हत्या केली. अंबिका अशोक आंबीकर वय (40) असं मृत पत्नीचे नाव तर अशोक आंबीकर वय (49) असे आरोपीचं नाव आहे.पती चारित्र्याचा संशय घेत असल्याने या दोघांत नेहमीच भांडणे होत असत. अशोक हे पत्नीला नेहमी ठार मारण्याची धमकी देत असत. अखेर पत्नीचा जीव घेऊन त्यांनी स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटनेने  दक्षिण सोलापूर तालुका हादरला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी मयताची मुलगी सिध्दव्वा कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून (Mandrup Police Station)  मंद्रूप पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Post a Comment

0 Comments