तळजापूर नगराध्यक्षपदाचे आरक्षण खुल्या प्रवर्गास राखीव;चुरशीचे सामने रंगणार .....भावीच्या सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल-Tuljapur Nagarpalika Election News

Hot Posts

6/recent/ticker-posts

तळजापूर नगराध्यक्षपदाचे आरक्षण खुल्या प्रवर्गास राखीव;चुरशीचे सामने रंगणार .....भावीच्या सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल-Tuljapur Nagarpalika Election News

तळजापूर नगराध्यक्षपदाचे आरक्षण खुल्या प्रवर्गास राखीव;चुरशीचे सामने रंगणार .....भावीच्या सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल-


तुळजापूर /रुपेश डोलारे प्रतिनिधी,,: तुळजापूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष पद सर्वसाधारण गटासाठी सुटले असून यामुळे आगामी निवडणुकीत मोठे राजकीय चुरस निर्माण होणार आहे. सन 2006 पासून या नगरपरिषदेवर महिला राज होते मात्र ते नगरसेवकांमधून निवडले गेले होते यावेळी मात्र नगराध्यक्ष जनतेतून थेट निवडला जाणारा असल्यामुळे निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. सन 2025 मध्ये प्रथमच पुन्हा पुरुष उमेदवारांना संधी मिळणार आहे त्यामुळे नगराध्यक्ष पदाच्या खुल्या प्रवर्गाच्या आरक्षणामुळे चुरशीच्या लढती रंगणार असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे नगराध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर होताच सोशल मीडियावर भावी नगरसेवकाच्या व्हिडिओ क्लिप ,पोस्ट व्हायरल होत आहेत त्यामुळे निवडणुकीपूर्वीच इच्छुक उमेदवारांसह समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण  झाले आहे त्यामुळे निवडणुकीत चुरशीच्या लढती रंगणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

दिनांक 6 ऑक्टोबर रोजी मुंबई येथे झालेल्या नगराध्यक्ष पदाच्या आरक्षण सोडतीमध्ये तुळजापूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष पद सर्वसाधारण गटासाठी निश्चित झाले आहे नगराध्यक्ष पद सर्वसाधारण गटासाठी सुटले असल्याने शहरातील राजकारण चांगलेच तापणार असून यंदा अनेक अधिक इच्छुक उमेदवार निवडणुकीत उतरण्याची शक्यता आहे.तसेच महायुती आणि महाविकास आघाडी मध्ये मध्ये चुरशीची लढत रंगणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे आगामी काळात कोणत्या राजकीय घडामोडी घडणार याकडे नागरिकाचे लक्ष वेधले आहे. 

लेखन संपादक : राजगुरु साखरे (बालाघाट न्यूज टाइम्स )

Post a Comment

0 Comments