एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या; सोलापुरातील हृदयद्रावक Solapur MBBAS Student Suicide News
सोलापूर / रुपेश डोलारे प्रतिनिधी : सोलापुरातील वैशंपायन वैद्यकीय महाविद्यालयात(MBBAS College) एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या एका डॉक्टर तरुणीने मंगळवारी दि,७ रोजी दुपारी राहत्या घरी अज्ञात कारणाने गळफास घेऊन आत्महत्या केली साक्षी सुरेश मैलापुरे वय 25 राहणार (आयएमएस शाळेसमोर जुळे सोलापुर) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे.
या घटनेबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की सोलापूर(Solapur) येथील वैशंयपान वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस च्या तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्य साक्षी मैलापुरे हिने मंगळवारी दुपारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या(Suicide) केल्याची उघडकीस आली आहे. साक्षी ही वैद्यकीय महाविद्यालयात हुशार विद्यार्थिनी होती सोमवारी तिचा तिसरा वर्षातला (Three years paper) शेवटचा पेपर झाला मंगळवारी सकाळी वीज मंडळाच्या महावितरण कार्यालयात मोठ्या पदावर असलेले वडील सुरेश मैलापुरे हे कार्यालयात कामाला गेले होते त्यामुळे घरी ती व तिची आई दोघेच होते. गळफास घेण्यापूर्वी तिने आपल्या मैत्रिणींना प्रोजेक्ट(project) संदर्भात फोन केल्याचे सांगण्यात आले आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही मुलीने फाशी घेतलेली बघून तिच्या आईला भोवळ आली व जमिनीवर जोरात पडली यात आईला(Mother Injury) डोक्यास गंभीर मार लागला आहे यात त्या जखमी होऊन रक्तबंबाळ झाल्या होत्या. ही घटना नातेवाईक व शेजारच्यांना कळाल्यानंतर त्यांनी तात्काळ साक्षी हिला खाली उतरून तिचा गळफास सोडवला आणि बेशुद्ध अवस्थेत असलेल्या तिच्या आईला शासकीय रुग्णालयात दाखल केले परंतु उपचारापूर्वीच साक्षीचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले या घटनेची नोंद(Incident Register Civil Police Solapur) सिव्हिल पोलीस चौकी येथे झाली आहे. ही घटना तिच्या मित्र-मैत्रिणींना व नातेवाईकांना समजल्यानंतर शासकीय रुग्णालयात एकच गर्दी झाली होती अभ्यासात साक्षी हुशार होती तिला अभ्यासाचे कोणतेही टेन्शन नव्हते परंतु तिने हे टोकाची पाऊल का उचलले याबद्दल सगळ्यांनीच आश्चर्य व्यक्त केले आहे या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
अधिष्ठाता तात्काळ हजर
ही घटना अधिष्ठाता डॉक्टर ऋत्विक जयकर यांना समजल्यानंतर त्यांनी तात्काळ पीएम कार्यालयाला भेट दिली साक्षी हिच्या आई-वडिलांकडे चर्चा केली त्यांना धीर दिला ही घटना पोलिसांना कळविण्यात आली आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले.
तपासून नंतर सत्य बाहेर येईल
साक्षी ही वसतिगृह ऐवजी घरीच आई-वडिलांसोबत राहत होती अभ्यासात हुशार होती तिला परीक्षेची कोणतीही टेन्शन नसल्याची घरच्यांनी सांगितले ही घटना सकाळी 11 ते 12 च्या दरम्यान घडली शेवटन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिलेला आहे पोलीस तपास झाल्यानंतर सत्य बाहेर येईल.
डॉ. नरेश झांजुड. विभाग प्रमुख पोस्टमार्टम विभाग सिव्हिल सोलापुर.

0 Comments